MP Udayanraje Bhosale esakal
सातारा

'एमआयडीसी'तील उद्योगांना नवी नियमावली जाहीर करा

बाळकृष्ण मधाळे

सातारा : साताऱ्याच्या मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनच्या (Manufacturers Association) पदाधिकाऱ्यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांची भेट घेवून लॉकडाउनमुळे (Lockdown) येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. तद्नंतर त्यांनी, उद्योग-व्यवसाय देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. सुमारे सव्वा वर्षांपेक्षा जास्त लोटालेल्या कोरोनामुळे (Coronavirus) सातारच्या दोन्ही एमआयडीसीमधील उद्योग आस्थापना डबघाईच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या पॉझिटिव्हीटी रेट इत्यादींच्या आकडेमोडीचा घोळ करत न बसता, जरूरीच्या नियमाधिन राहुन साताऱ्याच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही एमआयडीसीमधील (MIDC) उद्योगांना नवी नियमावली जारी करुन द्यावी, अशी मागणीही त्यांनी खासदार उदयनराजे यांच्या पुढे मांडली. (The Members Manufacturers Association Met To MP Udayanraje Bhosale At Jalmandir Palace Satara)

गेल्या वर्षभरात कोरोना हे संकट न समजता, संधी समजून सातारच्या एमआयडीसीमधील सर्व उद्योगांनी कोरोनाकाळातील नियन व अटींचे पालन केले आहे.

यावेळी मासचे अध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते उपस्थित होते. मासने सामूहिक प्रयत्नामधून वेळोवेळी स्वबळावर किंवा शासनाच्या सहकार्याने अनेक उपक्रम सातारा एमआयडीसीच्या विकासासाठी राबविले आहेत. मासचे पदाधिकारी, सदस्य हे स्वतः उत्पादक, उद्योजक असल्यामुळे त्यांना दैनंदिन येणा-या समस्यांची चांगली जाण आहे. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळात खर्चाची बचत करून कोरोना हे संकट न समजता संधी समजून सातारच्या एमआयडीसीमधील (Satara MIDC) सर्व उद्योगांनी कोरोनाकाळातील नियन व अटींचे पालन केले आहे. तथापि, आता संयम आणि धीर सुटत जाण्याची भीती उत्पादक उद्योजकांना वाटत आहे. ती भीतीही रास्त आहे. उत्पादन सुरु नसताना स्थायी आस्थापना खर्च करावाच लागत आहे. वीज, लाइटबील, सुरक्षाखर्च इत्यादी प्राथमिक स्वर्च थांबलेले नाहीत, अशा परिस्थितीत लॉकडाउन, संचारबंदी इत्यादी रोज बदलण्या-या सूचनांची अंमलबजावणी करताना उत्पादक आज मेटाकुटीला आला आहे.

त्यामुळे उद्योगक्षेत्र असलेल्या भागाकरिता औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी मास संस्थेशी चर्चा करून, समयसूचकता आणि काळाची गरज म्हणून येणा-या काळात नव्याने सुधारित आदेश जारी करावेत, उत्पादन-उद्योगांमुळे त्या-त्या भागातील अर्थचक्राला गती मिळत असते. ठप्प होण्याच्या मार्गावर असलेल्या औद्योगिक अर्थचक्राला गती देण्याचे नैतिक कर्तव्य जिल्हा प्रशासनाने आणि राज्य औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्त जबाबदारीतून पार पाडावे. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, उद्योजक अमोल कुलकर्णी, परेश सामंत, सचिन सामंत, अमित भालेराव, राहुल शिंदे, स्वप्निल बराडकर, केदार मुरुडकर, प्रसाद पंडित, प्रमोद पाटील, रणजित घोरपडे, माजी सभापती सुनील काटकर, बाळासाहेब ननावरे, विनित पाटील, शफी इनामदार आदी उद्योजक उपस्थित होते.

The Members Manufacturers Association Met To MP Udayanraje Bhosale At Jalmandir Palace Satara

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT