सातारा : लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी सामंजस्याने व सुसंवादाने तडजोड करून जास्तीतजास्त प्रकरणे मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले.जिल्हा न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्हा सरकारी वकील ॲड. महेश कुलकर्णी यांच्यासह न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार उपस्थित होते.
धोटे म्हणाल्या, ‘‘राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीतजास्त प्रकरणे निकाली निघण्यासाठी पक्षकारांचे मनपरिवर्तन करावे. वाद हा सुसंवादातूनच मिटला जातो. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक जाणांच्या निकटवर्तींयाचे निधन झाले. माणसाने माणसे जोडण्यासाठी सुसंवाद ठेवला पाहिजे.’’दरम्यान, आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयात दाखल असलेली विविध प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी ११ पॅनेल व ग्रामपंचायतीकडील घर व पाणीपट्टी प्रकरणांसाठी सातारा पंचायत समितीध्ये एक पॅनेल असे एकूण १२ पॅनेल तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पॅनेलमध्ये एक न्यायाधीश, दोन वकील व चार कर्मचारी असणार आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी पॅनेवरील न्यायाधीश व वकील यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन तृप्ती जाधव यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.