सातारा

व्यंकटपुरातील महिलेचे एटीएम चोरून करंज्यातील युवकाने हजाराे रुपयांवर मारला डल्ला

प्रवीण जाधव

सातारा : व्यंकटपुरा पेठेतील महिलेचे एटीएम कार्ड चोरून परप्रांतीय चोरट्याने 47 हजार 500 रुपये लंपास केले आहेत. याबाबत आशा किरण यादव (रा. व्यंकटपुरा पेठ, कलावतीआई मंदिराशेजारी) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार मन्टू भोला साह (वय 22, रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, करंजे, मूळ रा. हरपूर करह, बनियापूर, सारन बिहार) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

चार फेब्रुवारीला त्याने पर्समधील प्लॅस्टिक पाऊचमध्ये ठेवलेले एटीएम कार्ड चोरले. त्यानंतर त्याच्या आधारे त्याच व दुसऱ्या दिवशी एटीएममधून 47 हजार 500 रुपये काढून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार काशीद तपास करत आहेत. 

वाढे फाटा येथून दुचाकी लंपास

सातारा :
वाढे फाटा येथून वेण्णा नदीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर उघड्यावर शौचाला गेलेल्या परप्रांतीय युवकाला अडवून तिघांनी त्याची दुचाकी लंपास केली आहे. गोपाल रामलाल भिल्ल (सध्या रा. विठ्ठलनगर, खेड चौक, मूळ रा. देवोघरी सुंदरचा, जि. उदयपूर, राजस्थान) याने याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो मजुरीचे काम करतो. सोमवारी (ता. 15) सायंकाळी सातच्या सुमारास तो दुचाकीवरून वाढे फाटा येथून वेण्णा नदीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर शौचासाठी निघाला होता. या वेळी तीन अनोळखी युवकांनी अडवले. धक्काबुक्की केली. त्यानंतर एकाने चाकूचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दुचाकी लंपास केल्याचे भिल्ल याने फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत. 

विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा 

सातारा : शाहूनगर माहेर असणाऱ्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सांगली येथील पतीसह सासरच्या चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती महेश शांताराम यादव (वय 32), सासू कुसूम शांताराम यादव (वय 52), सासरा शांताराम दादू यादव (वय 60), नणंद सुजाता शांताराम यादव (वय 30, सर्व रा. 100 फुटी रोड, डी मार्टच्या विरुद्ध दिशेला, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत श्रृतिका महेश यादव (सध्या रा. शाहूनगर, गोडोली, सातारा. मूळ रा. 100 फुटी रोड, डी मार्टच्या विरुद्ध दिशेला, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

संशयितांनी सांगली येथील घरी संगनमताने उपाशी ठेवले, सतत टोमणे मारले, मारहाण, शिवीगाळ करत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने येथील भरोसा सेलमध्ये श्रृतिका यांचे समुपदेशन सुरू होते. त्या वेळी समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये गुन्ह्याचा प्रकार दिसून आला. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. जाधव यांनी लेखी पत्राद्वारे कळविल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जंगम तपास करत आहेत. 

दहा रुपयांचा भुर्दंड कशासाठी? एसटी महामंडळाने पुर्ननिर्णय घ्यावा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घेणं ही आयोगाची करप्ट प्रॅक्टीस - उद्धव ठाकरे

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT