MLA Prithviraj Chavan esakal
सातारा

माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश; कऱ्हाडात नळ योजनेसाठी 4 कोटींचा निधी

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील (Karad South Assembly constituency) घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत या गावांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. (4 Crore Sanctioned For Tap Water Supply Scheme To Villages In Karad Satara Marathi News)

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत या गावांच्या कामांना मंजुरी मिळाली होती.

ही कामे कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (Zilla Parishad Chief Executive Officer) प्रशासकीय मान्यता आवश्यक असते, त्यानुसार आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ६ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. 

जलजीवन मिशन अंतर्गत कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोगाव गावाला ९५ लाख ४६ हजार रुपये, बामणवाडी गावाला १ कोटी १४ लाख ९६ हजार रुपये, भुरभुशी गावासाठी ३८ लाख ८५ हजार रुपये, येवती गावासाठी १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये, साळशिरंबे गावासाठी ३७ लाख ४४ हजार रुपये, कोळेवाडी गावासाठी ८५ लाख ४० हजार रुपये अशा ६ गावांसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जवळपास ४ कोटी ९० लाख रुपये इतका भरघोस निधी मंजूर झाला असून या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेला सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून या कामांची निविदा निघाल्यानंतर ही कामे लवकरच सुरु होणार आहेत.

4 Crore Sanctioned For Tap Water Supply Scheme To Villages In Karad Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT