Mahabaleshwar
Mahabaleshwar esakal
सातारा

सावधान! महाबळेश्वरात कडक पोलिस बंदोबस्त; पर्यटकांना बंदी

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर : सातारा जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असून महाबळेश्वरात (Mahabaleshwar) हॉटेल व लॉजेसमध्ये पर्यटकांना घेण्यास बंदी आहे. परंतु, असे असले तरी शहरहद्दी बाहेर असलेल्या खासगी बंगले, लहान हॉटेल व लॉजमध्ये (Hotel And Lodges) पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. हेच पर्यटक महाबळेश्वरच्या बाजारपेठेत (Mahabaleshwar Market) देखील मनसोक्त फेरफटका मारताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Tourists Banned In Mahabaleshwar On The Backdrop Of Coronavirus Satara Marathi News)

महाबळेश्वरात हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांना घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या वाढीचा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी होत नसल्याने जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी संगीता राजापूरकर (Sangeeta Rajapurkar) यांनी या बाबत नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील अधिकृत हॉटेल व्यवसाय करणारे अनेक मोठी हॉटेल व लॉजेस या नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे (Lockdown) कायम घरात राहून कंटाळलेले पुण्या-मुंबईचे लोक पर्यटनासाठी बाहेर पडू पाहत आहेत. याकरिता ते हॉटेलसाठी महाबळेश्वर येथे फोन करून चौकशी करीत आहेत.

शहरातील हॉटेल मालक हॉटेल बंद आहे असे सांगतात. परंतु, शहराबाहेरील हॉटेल व लॉज मालक बेकायदेशीररित्या अशा पर्यटकांना प्रवेश देत आहेत. महाबळेश्वर पांचगणी मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व लॉजेस आहेत. अनेक खाजगी बंगले देखील आहेत. या बंगल्यातून देखील मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो. महाबळेश्वर-तापोळा रस्ता, महाबळेश्वर-प्रतापगड, महाबळेश्वर-केळघर या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर हॉटेल व लॉजेस आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनापरवाना हॉटेल व्यवसाय केला जातो. आज विकेंड असल्याने शुक्रवार पासून पर्यटकांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. शहरात नाक्यावर पालिकेच्या वतीने वाहनांची तपासणी केली जाते. ई-पास आहे का नाही याची तपासणी केली जाते.

Mahabaleshwar

तसेच शहरात तुम्हाला राहता येणार नाही याची कल्पना दिली जाते म्हणून अनेक पर्यटक शहरात न येता शहराबाहेर असलेल्या खासगी बंगल्यात व काही लहान हॉटेल, लॉजमध्ये राहणे पसंत करतात. या ठिकाणी कोणी तपासणी करीत नसल्याने बिन दिक्कत पर्यटकांची तीन-चार दिवसांची सहल यशस्वी होते. प्रशासनाच्या नजरेतून वाचविण्यासाठी पर्यटकांना जादा आकार द्यावा लागतो. लॉकडाउनमुळे कंटाळलेले पर्यटक जादा दर देवून सर्व सुखसोईंचा उपभोग घेत आहेत. तालुका प्रशासनाने या साठी तालुक्यातील अशा ठिकाणी छापा मारून विनापरवाना पर्यटकांना हॉटेल लॉजमध्ये प्रवेश देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शासनाचे नियम पाळून अनेकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतु, विनापरवाना धंदा करणाऱ्यांनी लॉकडाउनमध्ये देखील धंदा चालू ठेवला आहे. अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांना तालुका प्रशासन अद्द्ल घडविणार की नाही या कडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Tourists Banned In Mahabaleshwar On The Backdrop Of Coronavirus Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT