Traffic jam on Pune-Bangalore National Highway Alternative arrangement Provision of 98 crore 71 lakhs satara Sakal
सातारा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी फुटणार

जिल्ह्यात ९८ कोटी ७१ लाखांची तरतूद; इंदोली, शिवडे फाट्यावर भुयारी मार्ग होणार

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था होणार आहे. त्यासाठी तब्बल ९८ कोटी ७१ लाखांची तरतूद आहे. कऱ्हाड तालुक्यातील इंदोली, शिवडे फाट्यावर भुयारी मार्ग होणार आहे. सातारा तालुक्यातील काशीळ येथे सेवारस्त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. त्या पर्यायी व्यवस्थेमुळे स्थानिक वाहनांना प्रवास करता येईल. त्यामुळे तेथे होणारे अपघातही टाळता येणार आहेत. वाहतूक कोंडीही कमी होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदीकरणाच्या कामाच्या निविदा नुकत्याच खुल्या झाल्या आहेत. त्यात विविध कामांचा समावेश आहे. त्या कामाला किमान तीन महिन्यांनंतर सुरुवात होणार आहे. त्याच महामार्गावरील तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघातासह वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुविधा दिल्या आहेत. त्यासाठी ९८ कोटी ७० लाखांची तरतूदही केली आहे. जिल्ह्यातील इंदोली, मसूर फाट्यासह काशीळला त्या सुविधा होणार आहेत. इंदोली, मसूर फाट्यावर वाहन भुयारी मार्ग होणार आहे. काशीळला सेवारस्त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. इंदोली फाट्यावर होणाऱ्या वाहन भुयारी मार्गाची लांबी एक ते सव्वा किलोमीटर असणार आहे. २० बाय साडेपाच मीटरचा हा मार्ग आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही बाजूने सेवारस्ताही विकसित केला जाणार आहे. भुयारी मार्ग सेवारस्त्यासह पुन्हा महामार्गाला जोडला जाणार आहे.

भुयारी मार्ग सिमेंट पाइपच्‍या सहा मोऱ्या आहेत. मसूरच्या वाहन भुयारी मार्गाची लांबी दीड किलोमीटरची आहे. वीस बाय साडेपाच मीटरचा हा मार्ग आहे. दोन्ही बाजूने सेवारस्ताही दीड किलोमीटरपर्यंत विकसित केला जाणार आहे. त्या सेवारस्त्यावर दोन लहान पूलही आहेत. वाहन भुयारी मार्गातून येणारा सेवारस्त्यासह पुन्हा महामार्गाला जोडला जाणार आहे. काशीळला किमान दीड किलोमीटरचा सेवारस्ता विकसित केला जाणार आहे. त्यासाठी सेवारस्ता सुमारे तीन किलोमीटरचा आहे. तो किमान दोन्ही बाजूने चार किलोमीटरपर्यंत वाढविला जाणार आहे.

...अशी आहे तरतूद

  • इंदोली फाट्यावरील वाहन भुयारी मार्गासाठी ४५ कोटी ३५ लाख १४ हजारांची तरतूद

  • मसूर फाट्यावर वाहन भुयारी मार्गासाठी ४७ कोटी १७ लाख ७९ हजारांची तरतूद

  • काशीळ येथे सेवारस्त्यासाठी सहा कोटी १८ लाख ७५ हजारांच्या निधीची तरतूद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT