सातारा

टोल चुकविणा-यांच्या 'आयडिया' फसल्या; पोलिस खात्यावर व्यवस्थापन नाराज

तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावरील तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्‍यावर टोल चुकविण्यासाठी लाल (अंबर) दिव्यासह, बोगस आेळखपत्रांचा वापर होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. टोल व्यवस्थापनाने याबाबत कडक शिस्त व धोरण राबवून आतापर्यंत शेकडो बनावट आेळखपत्र, बोगस लालदिव्यांसह अंबर दिवे जप्त केले आहेत. 

टोल चुकविण्यासाठी खासगी वाहनावर पोलिस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, आमदार, खासदार, महापौर असे लिहून किंवा व्हीआयपी संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल वापरून, तसेच शासकीय खात्यात वरिष्ठ पदावर अधिकारी, कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र वापरून, तसेच लाल (अंबर) दिवे, पोलिस वर्दीतील टोपीचा वापर करून टोल बुडविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महामार्गावरील काही टोलनाक्‍यावर हा प्रकार पचतो, तर काही वेळा उघडकीस येतो.

सर्वसामान्यांसाठी एलआयसीचे शेअर्स खूले : एम. आर. कुमार
 
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्‍यावर असे टोल चुकवेगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे अनेक बोगस फंडे उघडकीस आले आहेत. टोल सवलतीसाठी बनावट ओळखपत्र बनवून देण्याचा व ती सर्रास वापरण्याचा गोरखधंदा या परिसरात तेजीत सुरू होता. टोल व्यवस्थापनाच्या वसुलीत तफावत जाणवल्यानंतर या बोगस आयकार्डचा "फंडा' उघडकीस आला. तासवडे टोलनाक्‍याचे व्यवस्थापक रमेश शर्मा, टोल इनचार्ज नरेंद्र लिबे यांनी आपल्या टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने टोल चुकविण्यासाठी बनावट ओळखपत्रांसह बनावट ओळखपत्रांचा वापर करणाऱ्यांचा बुरखा फाडण्यास सुरुवात केली आहे. त्यातून त्यांनी आतापर्यंत शेकडो बोगस ओळखपत्र व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. काहींवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आलिशान गाडी जप्तीची कारवाई केली आहे.

कदमांचा प्रामाणिकपणा; बॅंक ऑफ महाराष्ट्रात सापडलेले सोन्याचे दागिने, पैसे केले परत 

सद्यःपरिस्थितीत टोल चुकवेगिरी करण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखवणे, टोल कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रमाण वाढले आहे. लाखो रुपयांच्या आलिशान गाड्या वापरतात. मात्र, 75 रुपयांच्या किरकोळ टोलसाठी वाद आणि हुज्जत घालणारे अनेक आहेत. टोल प्रशासनाने जप्त केलेली कागदपत्रे संबंधित खातेप्रमुखांकडे सादर करणार असून, त्यात सर्वाधिक प्रमाण पोलिस खात्याचे आहे अशी माहिती रमेश शर्मा (व्यवस्थापक, तासवडे टोलनाका) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री Epstein Files केल्या जारी; १२०० पीडित मुली, ३५०० फाइल्स, हजारो फोटो, DVD आणि कागदपत्रं

Shashikant Shinde : अजित पवारांकडून अद्याप प्रस्ताव नाही; आघाडीबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्टीकरण

Kidney Trafficking: आणखी तिघांची किडनी काढली; मानवी अवयव तस्करीच्या रॅकेटचा देशभर विस्तार, पोलिस डॉक्टरच्या मागावर

Pune Municipal Election : प्रचार सभेसाठी लागणार शुल्क; पुणे महापालिकेकडून दर निश्‍चित

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

SCROLL FOR NEXT