Leopard
Leopard esakal
सातारा

FACT CHECK : सातारकरांनो! तुमच्या मोबाईलवर आलेला बिबट्याचा VIDEO सोनगावचा नाही

Balkrishna Madhale

सातारा : सातारा तालुक्यातील सोनगाव कचरा डेपोच्या (Songaon Garbage Depot) भिंतीवर सायंकाळी बिबट्या निवांत बसला होता. या बिबट्याचे चित्रण चारचाकीतून निघालेल्या सातारकराने घेत, ते प्रसारित केलं. हे चित्रण प्रसारित झाल्यानंतर सोनगाव परिसरसह इतर गावांत घबराट पसरली व त्या मार्गावरील वाहतूक भीतीपोटी बंद झाली. मात्र, आम्ही केलेल्या Fact check मध्ये हा व्हायरल व्हिडिओ (Video Viral) सातारचा नसून नागपुरातील (Nagpur) असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Trending-News-Nagpur-Gorewada-Leopard-Video-Viral-Satara-Songoan-Fact-Check)

सातारा तालुक्यातील सोनगाव कचरा डेपोच्या भिंतीवर सायंकाळी बिबट्या निवांत बसला होता. या बिबट्याचे चित्रण चारचाकीतून निघालेल्या सातारकराने घेत, ते प्रसारित केलं होतं.

सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर पहायला मिळतो. गेल्या काही दिवसांत बिबट्याने या भागातील कुत्री, शेळ्या-मेळ्यांवर हल्ला चढवत त्यांना ठार केल्याने या भागात बिबट्याची मोठी दहशत आहे. सध्या अन्नाच्या शोधार्थ बिबट्या इतत्र भटकताना दिसत आहे, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्या व्हिडिओला नेटिझन्सकडून तुफान कंमेन्टस आणि काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. सातारा तालुक्यातील सोनगाव कचरा डेपोच्या भिंतीवर सायंकाळी बिबट्या निवांत बसला होता. या बिबट्याचे चित्रण चारचाकीतून निघालेल्या सातारकराने घेत, ते प्रसारित केलं. त्यामुळे हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, सोनगाव कचरा डेपोत बिबट्या राखणीला बसवला आहे, की काय?, असा प्रश्न नेटिझन्सकडून कमेंटसच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. मात्र, आमच्या टीम या व्हिडिओची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, हा व्हायरल व्हिडिओ नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नागपुरातल्या 'या' प्राणीसंग्रहालयातील व्हिडिओ व्हायरल

गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक सातारकर त्यांच्या मोबाईलवर आलेला बिबट्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. मात्र, हा संबंधित व्हिडिओ नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील आहे. हा व्हिडिओ साधारणत: ऑक्‍टोबर महिन्यात चित्रित झाल्याचा अंदाज आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ साताऱ्यातील नसून नागपुरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Trending-News-Nagpur-Gorewada-Leopard-Video-Viral-Satara-Songoan-Fact-Check

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

RCB Qualification Scenario : RCB प्ले ऑफमध्ये जाणार? 18 तारखेला, 18 रन्स, 18 ओव्हर्स अन् चेन्नईचा खल्लास खेळ; समजून घ्या गणित

Uddhav Thackeray : मोदीजी तुम्ही पेपर हाती घेऊन उभे राहा.. उद्धव ठाकरेंनी गजनी सरकार म्हणत पंतप्रधानांना दिले प्रत्युत्तर

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

VIDEO: अन् अनुष्कानं थेट हात जोडले; आरसीबी मॅच जिंकताच विरुष्काचं हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT