सातारा

अंधारात चाचपडणारी गावं होणार प्रकाशमान; डोंगरी भागाला दिलासा

कृष्णात साळुंखे

चाफळ (जि. सातारा) : गमेवाडी (ता. पाटण) येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून डोंगरी विद्युत विकास आराखड्यातून मंजूर झालेल्या 12 विद्युत खांबांची उभारणी नुकतीच करण्यात आली. या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरतराव साळुंखे, इरफान मुल्ला, गमेवाडीचे सरपंच कुणाल साळुंखे, चाफळ सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सुनील पाटील उपस्थित होते. 

गमेवाडीचे सरपंच कुणाल साळुंखे, इरफान मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यामुळे हे विजेचे खांब उभे राहत आहेत. त्यासाठी गृहराज्यमंत्री देसाई यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यासह प्रयत्नांमुळे गमेवाडीसह आठ वाड्यावस्त्यांवर विजेचे खांब उभे राहत आहेत. चाफळसह, पाडळोशी, दाढोली, चव्हाणवाडी, केळोली, सडादाढोली, सडावाघापूर, वाघजाईवाडी परिसरातील लहान-मोठ्या वाड्यावस्तीवर विजेचे खांब उभे राहणार आहेत. काही ठिकाणी कामे झाली आहेत. काही ठिकाणी त्यांची सुरवात झाली आहे. त्यामुळे वाड्यावस्त्यांसह डोंगरी भागातील ठिकाणी अनेक वर्षे अंधारात चाचपडणारी गावे आता प्रकाशमान होणार आहेत. 

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून डोंगरी विद्युत विकास आराखड्यातून मंजूर झालेल्या निधीतून गमेवाडीसारख्या छोट्याशा गावात चौकाचौकात बारा विजेचे खांब उभे राहणार आहेत. त्यामुळे घराघरांत व रस्त्यावरील खांबांवर विजेचे बल्ब दोन दिवसांत चमकणार आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अज्जू रडवलंस यार..! अजिंक्य रहाणे निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना रडला, Video Viral

Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Viral Video : "बहि‍णींची काळजी घे, आईला दुखवू नकोस..." मृत्यूच्या दारात असलेल्या वडिलांचा चिमुकल्याला शेवटचा संदेश, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेच्या कारवाईला FDA कर्मचारी वैतागले, थेट मंत्र्यांकडेच तक्रार; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT