सातारा

मृत शेतकऱ्याच्या वारसांना 'वीज वितरण'चा आधार

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : येथे शुक्रवारी (ता. 21) विजेचा शॉक बसून मृत्युमुखी पडलेल्या नारायण किसन पार्टे या शेतकऱ्याच्या वारसांना वितरण कंपनीने तातडीची मदत म्हणून 20 हजार रुपयांचा धनादेश दिला. या वेळी केळघरचे माजी सरपंच सुनील जांभळे, सचिन पार्टे,
बाजीराव पार्टे, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आनंद ओव्हाळ, विशाल जाधव, विश्वनाथ डिगे, नीलेश सपकाळ यांची उपस्थिती होती.
 
वीज वितरण कंपनीच्या वतीने अशा दुर्दैवी घटनांप्रसंगी तातडीने मदत देण्यात येते. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित मदत देण्यासाठी वीज वितरण कंपनी प्रयत्नशील असते. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून वीज वितरण कंपनी दक्षता घेत
असल्याची माहिती शाखा अभियंता राहुल कवठे यांनी दिली.

केळघर विभागासह तालुक्‍यामध्ये वीज वितरण कंपनीच्या सेवेबाबत ग्राहकांच्या काही तक्रार असतील तर वीज वितरण कंपनीच्या मेढा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. तद्नंतर ग्रामस्थांनी आपल्या काही अडचणी कंपनीला सांगत त्या त्वरित सोडवल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, वीज कंपनीच्या अधिका-यांनी त्यास प्रतिसाद देत सर्व समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

Maharashtra Sugar: माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाची धुरा सांभाळणार

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

SCROLL FOR NEXT