Sandalwood
Sandalwood esakal
सातारा

एमआयडीसीतून चंदन चोरी करणाऱ्या साताऱ्यातील दोघांना अटक

गिरीश चव्हाण

सातारा : येथील जुनी एमआयडीसीत (MIDC) असणाऱ्या कंपनीच्या आवारातून चंदन (Sandalwood) चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. जुन्या एमआयडीसीत एस. के. प्लास्ट नावाची कंपनी असून, याठिकाणाहून चोरट्यांनी चंदनाचे झाड, रोकड, दोन मोबाईल चोरून नेले होते. (Two Arrested In Satara Sandalwood Theft Case Satara Crime News)

याची तक्रार नोंद झाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी तपासाच्या सूचना पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना केल्या होत्या. यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरणचे अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतिराम पवार, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांना तपासाच्या सूचना दिल्या. या पथकाने कोडोलीतील दत्तनगर परिसरातून धीरज कैलास भोसले (वय 20, रा. वडूथ, ता. सातारा) आणि रोहित पितांबर शिंदे (वय 21, रा. संगमनगर, सातारा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेले चंदन व इतर साहित्य असा सुमारे 8 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Coronavirus : खोटी माहिती देणाऱ्या बाधितांवर आता थेट गुन्हा; मुख्याधिकाऱ्यांचे सक्त आदेश

Two Arrested In Satara Sandalwood Theft Case Satara Crime News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT