सातारा

'या' शहरातील 'त्या' पेठेत पुन्हा दोन महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

सचिन शिंदे

कऱ्हाड ः येथील मंगळवार पेठेतील पाटील गल्लीत पुन्हा दोन महिन्यांनी कोरोनाने शिरकाव केला आहे. तेथील दोन मुलांचा अहवाल कोरोना बाधित आला. त्या दोन्ही मुलांना त्यांच्या आजी व मामापासून कोरोना झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये सात वर्षांचा मुलगा, तर अकरा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. संबंधित दोन्ही मुले 27 जूनपासून त्यांच्या बनवडी येथे मामाकडे होते.
सातारा शहरातील एकाचा मृत्यू

 
त्या दोघांचे 84 वर्षांचे आजोबा मुंबईत कोरोना बाधित आले होते. त्यांचे 25 जून रोजी मुंबईतच निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मुंबईत झाला. अंत्यविधीनंतर त्यांचे रक्षा विसर्जन बनवडी येथे झाले. मुंबईहून आजी व मामा 26 जूनला रात्री बनवडी येथे आले होते. त्यासाठी संपूर्ण कुटुंब 27 जूनपासून बनवडी येथे त्यांच्या घरी राहिले होते. 28 जून रोजी रक्षा विसर्जन झाले. त्यानंतर दोन्ही मुलांचे आजी व मामाही कोरोना बाधित ठरले आहेत. दोन्ही बाधित त्या वेळी ते कऱ्हाडमध्ये आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याचा शोध सुरू आहे. त्या दोघांपासूनच मुले कोरोनाबाधित ठरली आहेत.
ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

संपादन - सिद्धार्थ लाटकर

कोरोना रोखण्यासाठी झेडपी सरसावली; गावपातळीवर केल्या या उपाययोजना  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

Amit Shah Fake Video Case : रेवंथ रेड्डींचे वकील दिल्ली पोलिसांसमोर हजर; दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT