Omicron Virus Impact esakal
सातारा

Omicron Virus Impact : आठवड्यात दोन दिवस मुलांसाठी लसीकरण

प्रशांत घाडगे

ओमिक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण सुरू करणार आहे.

सातारा : जिल्ह्यात तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Center), ग्रामीण रुग्णालये (Rural Hospital), उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी ऑनलाइन पद्धतीनुसार लसीकरण होणार आहे.

कोरोनाबरोबर ओमिक्रॉन (Omicron Virus) या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन 15 ते 18 वयोगटाचे लसीकरण सुरू करणार आहे. या संदर्भात आज येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. ओमिक्रॉन संसर्गाबाबत नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. घराच्या बाहेर पडताना प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. ज्या खासगी आस्थापना शासनाने व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत, अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही, अशा नागरिकांनी प्राधान्याने पहिला डोस घ्यावा. तसेच पहिला डोस घेऊन दुसरा डोस न घेणाऱ्यांनी डोस घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.

कोव्हॅक्‍सिन लस देणार

जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्‍सिन लस देण्यात येणार आहे. या लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी पालक, शाळा व महाविद्यालये व्यवस्थापकांनी जबाबदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT