सातारा

गांधील माशांच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या गच्चीवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना महिंद (ता. पाटण) येथील बौद्धवस्तीत घडली आहे. अनुष्का दिनेश यादव (वय १२) आणि शेजल अशोक यादव (वय आठ) अशी मुलींची नावे आहेत. या घटनेत आणखी पाचजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार साेमवारी (ता.26) सायंकाळी पाचच्या सुमारास महिंद येथील बौद्धवस्तीतील तुकाराम ज्ञानू यादव यांच्या घराच्या गच्चीवर अनुष्का, शेजल व आणखी एक लहान मुलगा असे तिघेजण खेळण्यास गेलेले होते. त्यावेळी त्यांच्या घरापाठीमागे असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारणाऱ्या वानरांच्या कळपाचा लगतच्याच पडक्या घराच्या छप्परास असलेल्या गांधील माशांच्या पोळ्याला धक्का लागला. त्यामुळे चवताळलेल्या माशांनी गच्चीवर खेळणाऱ्या मुलांवर जोरदार हल्ला चढवला. मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या यादव कुटुंबियातील काही जणांनाही माशांनी चावा घेत जखमी केले.

लग्नाअगोदर बारसे घालायची अनेकांना घाई; जयकुमार गाेरेंचा 'राष्ट्रवादी'ला टाेला

त्यानंतर तातडीने अनुष्का, शेजल व अन्य जखमींना उपचारासाठी तळमावले येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यापैकी अनुष्काचा उपचारा दरम्यान काही वेळानी तर रात्री एकच्या सुमारास शेजलचाही मृत्यू झाला. अनुष्काचे मुळगाव येळगाव (ता.कऱ्हाड) असून काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोळी महिंद येथे आली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबई-हैदराबाद हायस्पीड ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार! कसा असणार मार्ग? वाचा सविस्तर

Pune Crime : तरुणीशी संबंध तोडण्याच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची हत्या; दोन आरोपी फरार!

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Jalgaon Municipal Elections : जळगावात 'नारीशक्ती'चा डंका! १८ पैकी १२ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी महिला विराजमान

Latest Marathi News Live Update : चाळीसगावात गोळीबार प्रकरणी चार आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT