Udayanraje Bhosale News esakal
सातारा

Satara : राड्यानंतर दुसऱ्याच दिवशी उदयनराजेंनी असं काही केलं की, त्याचा तुम्हालाही हेवा वाटेल!

पायाभूत सुविधांपेक्षाही मुलांना शिक्षण देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

उदयनराजे यांच्या माध्यमातून ४५ हजार शालेय वह्यांचे वाटप जलमंदिर येथे झाले.

सातारा : ‘आजचे विद्यार्थी राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. पायाभूत सुविधांपेक्षाही मुलांना शिक्षण देणे हे अत्यंत महत्त्वाचे व सर्वोच्च प्राधान्य देण्याची बाब आहे.

म्हणूनच शिक्षणाची (Education) आवड निर्माण होण्यासाठी आणि पालकांचाही आर्थिक भार थोडा का होईना कमी होण्यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका शाळांमधील सुमारे १२ हजार मुलांना सुमारे ४५ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले आहे,’ असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सांगितले.

उदयनराजे यांच्या माध्यमातून ४५ हजार शालेय वह्यांचे वाटप जलमंदिर येथे झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, विनीत पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब राक्षे, विजय नायकवडी प्रमुख उपस्थित होते.

शासनाने प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे ओझे कमी केले आहे. तथापि, विद्यार्थ्यांना एका विषयाकरिता एक वही तरी असणे आवश्यक आहे, तसेच आम्ही सामाजिक कार्य करीत असताना एक कौटुंबिक जबाबदारी म्हणूनही आम्ही कर्तव्य समजून वह्यांचे वाटप जिल्ह्यातील नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना करण्याचे धोरण गेल्या काही वर्षांपासून आखले आहे.

गेल्यावर्षीही वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. जबाबदारी, कर्तव्‍य म्हणून वह्या वाटताना समाधान वाटत असल्‍याचेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. कार्यक्रमास सातारा, कऱ्हाड, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी, फलटण नगरपालिकांच्या शिक्षण मंडळांकडे विद्यार्थी पटसंख्येनुसार वह्या प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक, उदयनराजे भोसले मित्रसमूहाचे सदस्य, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे बारामती विमान दुर्घटनेतील मृत पिंकी माळीच्या निवासस्थानी दाखल होणार

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT