Udayanraje Bhosale Top Breaking News in Marathi  System
सातारा

आमदार खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका; उदयनराजेंची भुमिका

उदयनराजे भाेसले हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात काही प्रशासकीय कामानिमित्त आले हाेते. तेव्हा पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्ती केली.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द (Maratha Reservation) केल्याने राज्यातील नेत्यांमध्ये विशेषतः मराठा समाजातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) देखील आज (शुक्रवार) न्यायालयाच्या निर्णायवर तीव्र नाराजी व्यक्ती केली. udayanraje bhosale maratha reservation satara breaking news

उदयनराजे भाेसले हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात काही प्रशासकीय कामानिमित्त आले हाेते. तेव्हा पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्ती केली.

दरम्यान आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आडवा. त्यांना घरातून बाहेर पडून देऊ नका. आरक्षण का मिळाले नाही, याचा जाब विचारा. त्यातून तुमचे समाधान झाले नाही तर माझ्यासह सर्वांना घराबाहेर फिरून देऊ नका. समाजामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. माझ्यामुळे समाज आहे, अशा मस्तीत आमदार व खासदारांनी राहू नये. मराठा समाजाने ठरविले तर तुमची मस्ती एका दिवसांत उतरवतील, असा इशारा साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

आरक्षण प्रश्नी तुम्ही पंतप्रधानांशी बोलणार आहात का, यावर उदयनराजे म्हणाले, भेटण्याचा प्रश्न नाही. राज्य शासन काय करतंय, त्यांच्या अखत्यारीतील हा विषय असून केंद्राकडे बोट दाखवू नका, तुम्ही आजपर्यंत काय केले ते सांगा. राज्य सरकारचे अपयश आहे का, यावर ते म्हणाले, जाती जातीत तेढ निर्माण करून सत्तेची पोळी भाजून घ्यायचा उद्योग चालला आहे. एखाद्याला मागायवर्गीय म्हणायचा अधिकार मला दिला कोणी. मग मी ओबीसी म्हणून एकमेकांशी बोलणे सोडून द्यायची का. याचं माणूसकी कुठे गेली आहे. मी माझी भूमिक सांगितली आहे. लवकरच सविस्तर भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT