Udayanraje Bhosale esakal
सातारा

'पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला'; डायलॉग मारत उदयनराजेंनी उडवली कॉलर

सकाळ डिजिटल टीम

उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळं ओळखले जातात.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या हटके स्टाईलमुळं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळं उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये खूपच प्रिय आहेत. खासदार उदयनराजे यांचा उद्या 24 फेब्रुवारीला वाढदिवस असून यानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonali Kulkarni) यांच्या उपस्थितीत 'होम मिनिस्टर' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उदयनराजेंना चाहत्यांनी 'पुष्पा' (Pushpa : The Rise) चित्रपटातील डायलॉग म्हणण्याची विनंती केली. याला उदयनराजेंनी आपल्या हटके स्टाईलनं ‘पुष्पा..पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला..।’ असा डायलॉग म्हणत तिथं उपस्थित असलेल्या चाहत्यांची मनं जिंकली.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. भाजपचे खासदार उदयनराजेंवर देखील 'पुष्पा' सिनेमाचा प्रभाव दिसून आलाय. उदयनराजे दुसऱ्यांदा शर्टाची कॉलर उडवत सिनेमातील डायलॉग मारताना दिसून आले. काल (मंगळवार) साताऱ्यातील एका कार्यक्रमात त्यांनी पुष्पा सिनेमातील डायलॉग मारत नेहमीप्रमाने कॉलर उडवली. या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं देखील हजेरी लावली होती.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राईज' या सिनेमानं रिलीज होऊन अनेक विक्रम केले आहेत. हा सिनेमा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं 9 व्या आठवड्यातही तब्बल 1.39 कोटींची कमाई केलीय. या सिनेमानं कमी कालावधीत अनेक विक्रम केलेत. बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं 100 कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: RBI सरकारला देणार तब्बल 2.87 लाख कोटी! कारण काय? बँकिंग,शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

IPL 2026 Playoff Scenarios: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध Eliminator सामना कोण खेळणार? एका जागेसाठी ४ संघात टक्कर; पाहा समीकरण

Pune Metro Leak : पुणे मेट्रोत गळती! कोट्यवधींच्या प्रकल्पाच्या सुरक्षेवर मोठा सवाल; VIDEO पाहून पुणेकर हादरले

Marathi Live News update: अमरावती जिल्ह्यात 24 वर्षीय युवकाचा 11 केव्ही लाईन चा शॉक लागून मृत्यू

Cockroach Janta Party चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक! तुमचं इन्स्टाग्राम हॅक होऊ नये यासाठी आजच बदला 'या' 3 सेटिंग

SCROLL FOR NEXT