सातारा

कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी उंब्रज पोलिसांची आयडिया वाचा

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि.सातारा) : उंब्रज पोलिस स्टेशन हद्दीत पुणे, मुंबई व बाहेर जिल्ह्यातून आपल्या गावामध्ये विनापास आलेले व गावामध्ये विनाकारण फिरत असणाऱ्यांची छायाचित्रे, नाव पोलिसांना कळवा. आपले नाव गोपनीय ठेऊन कोरोना संसर्गाचे कारण ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उंब्रज पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.
केशरी कार्डधारकांसाठी शासनाने घेतला 'हा' निर्णय 
 
सातारा जिल्ह्यामध्ये पासशिवाय येण्यासाठी जिल्हाबंदी असताना बाहेर जिल्ह्यातून कोणतेही अत्यावश्‍यक कारण नसताना वैध परवाना व पास नसताना कोणत्याही मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करून कोणीही उंब्रज पोलिस ठाणे हद्दीमध्ये आला, तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचा इशाराही श्री. गोरड यांनी दिला आहे.

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी; आता सिव्हिलमध्ये 'ही' यंत्रणा ठरणार उपयुक्त 

पुणे, मुंबई व बाहेर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांना विनंती, की आपण आहे त्या ठिकाणी थांबा. आपल्या येण्यामुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्गजन्य आजार पसरू शकतो. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. आपणाला अत्यावशक कारणासाठी यायचे असेल, तर रीतसर पास काढून येणे आवश्‍यक आहे. आपण शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे कोटकोरपणे पालन करा. आपल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्‍यात घालू नका. अन्यथा गुन्हे दाखल करून कडक कारवाई होणार आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर आपले क्राईम रेकॉर्ड तयार होणार आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला सरकारी/खासगी नोकरी/पासपोर्ट व इतर कामकाज करिता अडचणीचे ठरणार आहे, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा काळजी वजा इशारा उंब्रज पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद 

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांकडून माणुसकीचे दर्शन : नुकसानग्रस्त दहा गावात  केले बागा आणि शेती उभी करण्याचे काम... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT