technique of winning elections sakal
सातारा

‘पाडापाडीच्या राजकारणात….’, एकनाथ शिंदेंनी सांगितले निवडणुका जिंकण्याचे तंत्र

मंत्री एकनाथ शिंदे; कऱ्हाडात पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिबिर

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचे तंत्र पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी गोळाबेरीज करावी लागली, तर तीही करा. अन्यथा पाडापाडीच्या राजकारणात आपणच आपला खड्डा खोदून बसू. आत्मपरीक्षण व आत्मचिंतन करत पुढे जा. सरकार म्हणून मुख्यमंत्री ठाकरे व मंत्र्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून शिवसैनिकांनी गावागावांत व घराघरांत शिवसेना (Shiv Sena) व शिवसैनिक निर्माण करावा, असे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Eknath Shinde Satara Rally)

पश्चिम महाराष्ट्र शिवसेना पदाधिकारी संवाद शिबिरात मंत्री शिंदे बोलत होते. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, अनिल बाबर, शिवसेना नेते दिवाकर रावते, सातारा- सांगलीचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) झाल्यामुळे शिवसेना वाढवण्याची संधी शिवसैनिकांना आहे. सत्तेचा वापर शंभर टक्के समाजकारण व समाजसेवेसाठी करता येतो. झालेल्या चुका मान्य करून पुढे जा.’’ मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या काळात सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याने राजकीय पार्श्वभूमी नसलेले अनेक जण सत्तेत गेले.

शिवसेना मजबूत असल्यामुळे आपण अनेक ठिकाणी विजयी खेचून आणू शकतो. शिवसैनिकांनी निवडणुकीपुरते लोकांच्या संपर्कात राहून चालणार नाही. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’ मंत्री सामंत म्हणाले, ‘‘शिवसेना हाच पक्ष वंचित घटकाला न्याय देऊ शकतो. शिवसेनेने केलेले कार्य, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने घेतलेले निर्णय, राबवलेल्या योजना शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत.’’ मंत्री देसाई म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धाडसाने पावले टाकून राज्यातील जनतेच्या हितासाठी निर्णय घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT