Corona esakal
सातारा

साताऱ्यात मास्क न घालणाऱ्या 'बेफिकीर' नागरिकांच्या पाया पडून 'गांधीगिरी'

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वांना मास्क वापरण्याचे बंधन घातले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : वारंवार आवाहन करूनही मास्क न वापरणाऱ्या बेफिकीर नागरिकांच्या पाया पडून सातारा कोविड डिफेंडर ग्रुपच्या सदस्यांनी बाजारपेठेत गांधीगिरी केली. या वेळी या ग्रुपतर्फे अनेकांना मास्कचे वितरणही करण्यात आले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वांना मास्क वापरण्याचे बंधन घातले आहे, तरीही अनेक नागरिक मास्कचा वापर न करता बेफिकीर राहात होते. या नागरिकांमुळे अनेकांचे आरोग्य धोक्‍यात येत होते. अशा बेफिकीर नागरिकांचा गांधीगिरीच्या माध्यमातून सत्कार करण्याचा निर्णय सातारा कोविड डिफेंडर ग्रुपच्या वतीने घेण्यात आला.

त्यानुसार या ग्रुपच्या सदस्यांनी साताऱ्यातील बाजारपेठ, मंडई, दुकानात मास्क न वापरता खरेदीसाठी आलेल्या, तसेच मास्क न घालता साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या पाया पडण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर नागरिक, दुकानदारांनी मास्कचा वापर करणे सुरू केले. या आंदोलनादरम्यान ग्रुपच्या सदस्यांनी अनेकांना मास्कचेही वितरण केले.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT