Mahesh Shinde esakal
सातारा

Political News : कोरेगावात आमदार महेश शिंदेंचा करिष्मा कायम

सकाळ डिजिटल टीम

शेवटच्या दिवसअखेर सोसायटीच्या 13 जागांसाठी 31 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

सातारा : कोरेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या (Koregaon Society Election) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक काल अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. कोरेगाव नगरपंचायत (Koregaon Nagar Panchayat), कोरेगाव भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच चुरशीने झाली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव ग्राम सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक चुरशीने होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सोसायटीच्या १३ जागांसाठी ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

मात्र, काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Satara Bank) संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, उदयसिंह बर्गे, राजेंद्र बर्गे, गुलाबराव बर्गे, संतोष बर्गे आदींनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज उरल्याने निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून विठ्ठल रामचंद्र काटे, शिवलिंग विठ्ठल बर्गे, हिंदुराव दादू नांदे, नारायण रामचंद्र बर्गे, संजय प्रल्हाद बर्गे, सयाजी शिवाजीराव बर्गे, शरद विठ्ठल बर्गे, अनिल चंद्रकांत बर्गे, महिला राखीव मतदारसंघातून मालन बाळासाहेब महाडिक, सुमन धर्मराज बर्गे, इतर मागास प्रवर्गातून तानाजी लक्ष्मण नाळे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रामचंद्र अप्पासाहेब बोतालजी, विशेष मागास प्रवर्गातून सचिन हणमंत कोकरे या १३ जणांचा समावेश आहे.

Koregaon Society Election

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सोसायटीचे सचिव अतुल धुमाळ आदींनी सहकार्य केले. दरम्यान, निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर ग्राम सोसायटीच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर कोरेगाव बाजार समितीच्या सभागृहामध्ये ग्राम सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा, तसेच सोसायटीच्या अर्थात शेतकरी सभासदांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपले अर्ज मागे घेतलेल्यांचा प्रातनिधिक स्वरूपात सत्कार सुनील खत्री, किरण बर्गे, राजाभाऊ बर्गे आदींच्या हस्ते करण्यात आला. त्यात श्री. खत्री यांनी जिल्हा बँकेचा संचालक या नात्याने कोरेगाव ग्राम व भाग या दोन्ही सोसायट्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT