Medicine
Medicine esakal
सातारा

इथं घडतंय माणुसकीचं दर्शन! कोरोनाग्रस्तांसाठी संस्थांची साथ, संकटकाळात अनेकांचा मदतीचा हात

दिलीपकुमार चिंचकर

दहिवडी (सातारा) : सध्या जगावर कोरोना (Coronavirus) संकट उभं ठाकलं आहे. यात अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहीजण या आजारात माणुसकीचं दर्शन घडविताना दिसत आहेत. मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राणंद प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास फार्मासिस्ट नीलेश पवार व मित्र परिवाराकडून सव्वा लाख रुपयांची औषधे मदत म्हणून देण्यात आली. डॉ. सुप्रिया कोल्हे (Dr. Supriya Kolhe) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका दीपाली (Deepali Sabale) साबळे या उपकेंद्राचा कारभार पाहतात. पुणे येथील फार्मासिस्ट व गावचे सुपुत्र नीलेश पवार यांनी स्वतः व मित्र परिवाराच्या मदतीने मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी एक लाख 30 हजारांची औषधे खरेदी करून उपकेंद्राला दिली. या वेळी नीलेश पवार, सरपंच पुष्पा चव्हाण, उपसरपंच प्रसाद शिंदे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार फडतरे, विक्रम कदम उपस्थित होते. (Various Organizations In Satara District Are Providing Medicine And Financial Help For Corona Patient)

अहिंसा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांतर्फे कोविड सेंटरला एक दिवसाचा पगार

म्हसवड : येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार जनकल्याण समिती कोविड सेंटरसाठी व्यवस्थापक दीपक मासाळ यांच्या हस्ते सुपूर्द केला. या सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार, औषधे व जेवणाची सोय आहे. पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊन खारीचा वाटा उचलला असून सेवाभावी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी केले. यावेळी रामचंद्र नरळे, डॉ. मासाळ, अकील काझी, किरण कलढोणे, बंटी खाडे, संजय टाकणे, अर्जुन कांबळे, अतिश भोरे, अर्जुन कांबळे, अमर रोकडे, दादासाहेब माळी, किशोर सराटे, प्रशांत दोशी, कर्मचारी उपस्थित होते.

गोखळीत 20 बेडचा विलगीकरण कक्ष

आसू : गोखळी (ता. फलटण) येथील युवक गावातील कोरोना हद्दपार करण्याच्या इराद्याने पुढे आले आहेत. येथील कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी त्यांनी ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून ग्रामपंचायतीची नवीन इमारत व प्राथमिक शाळेत 20 बेडचा विलगीकरण कक्ष सुरू केले. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीचे आजी- माजी पदाधिकारी, गावातील डॉक्‍टर्स, दानशूर व्यक्ती आणि आरोग्य विभागाची मदत घेतली आहे. सेंटरसाठी तरुणांनी ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोणी आर्थिक, तर कोणी वस्तू रूपाने मदत केली. गावातील डॉक्‍टरांनी रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याची तयारी दर्शवल्याने या कामाला चांगलीच गती मिळाली आणि विलगीकरण कक्ष कार्यान्वित झाले. सध्या या कक्षात 17 रुग्ण दाखल झाले असल्याचे ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांनी सांगितले.

डॉ. शिवाजी गावडे, डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ. विकास खटके यांच्यासह गोखळी आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सानिया शेख, आरोग्यसेविका लोंढे, आशा वर्कर्स दुर्गा आडके हे सर्व रुग्णांना मदत करत आहेत. सोमनाथ वायसे, गोरख हरीहर यांनी रुग्णांची मोफत रक्त तपासणी करून देण्याचे मान्य केले आहे. माजी सरपंच नंदकुमार गावडे हे रुग्णांना लागणारी औषधे पुरवत आहेत. पै. दीपक चव्हाण यांनी गॅस शेगडी दिली असून, ते रुग्णांना दररोज अंडी, चहा, नाष्टा पुरवत आहेत. येथील कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच डॉ. अमित गावडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, माजी उपसरपंच राधेश्‍याम जाधव, ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप, शांताराम गावडे, पोलिस पाटील विकास शिंदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांच्यासह राहुल भारती, ज्ञानेश्वर घाडगे, धनंजय गावडे, प्रशांत गावडे, योगेश भागवत, अमोल हरीहर, सचिन धुमाळ, गणपत डुबल, संतोष गावडे, हणमंत हरीहर, अभिजित जगताप या युवकांनी विशेष प्रयत्न केले.

कोरोनामुक्तीसाठी झटतायेत वर्णेकर

अंगापूर : वर्णे (ता. सातारा) येथे कोविड रुग्णांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या केअर सेंटरच्या मदतीसाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. वर्णे (ता. सातारा) येथे कोविडचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागल्याने संपूर्ण गावच कोरोनाग्रस्त होतेय, की काय असे वाटू लागले होते. बाहेर हॉस्पिटलमधे जागा मिळत नव्हत्या, बेड मिळत नव्हते, वेळेवर योग्य औषधोपचार मिळत नव्हते, त्यामुळे गावातील काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. आपले गाव कोरोनामुक्त करायचे, यासाठी सर्व जण प्रयत्न करत असतानाच गावचे भूमिपुत्र श्रीकांत व शशिकांत पवार या बंधूंनी आपल्या टॉप गिअर कंपनीच्या माध्यमातून गावातच कोविड केअर सेंटर सुरू करून त्यात सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. यात ऑक्‍सिजन मशिन, वाफारा मशिन, आंघोळीसाठी गरम पाणी, वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर सोय, करमणुकीसाठी टीव्ही या सर्व सुविधांमुळे रुग्णाला आपण घरीच आहोत, असे वाटते आहे.

याठिकाणी असणाऱ्या रुग्णांना नाश्‍ता, सकाळ व संध्याकाळचे जेवण यासाठी गावातील अनेक दानशूर व्यक्ती मदत करत आहेत. त्यांना गावातील सार्वजनिक तरुण मंडळांचीही आर्थिक साथ लाभत आहे. काही गावांतील व मुंबईस्थित ग्रामस्थांनी आर्थिक स्वरूपाची मदत सरपंच विजय पवार यांच्याकडे सुपूर्द केली आहे. पेंटिंग कॉन्ट्रॅक्‍टर दादासाहेब काळंगे यांनी वाढदिवसाचा संपूर्ण खर्च (दहा हजार रुपये) या कोविड सेंटरला दिला. माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण धस्के, जयसिंग काळंगे व वैभव पवार हेही सहकार्य करत आहेत. माजी पंचायत समिती सदस्या सुनीता सरडे यांनी 10 हजार रुपयांचा किराणामाल देऊन सहकार्य केले. कोरोना रुग्ण लवकर बरे व्हावेत म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांबरोबर गावातील सर्व डॉक्‍टर वेळोवेळी रुग्णांची तपासणी, औषधोपचार यासाठी विना मोबदला सेवा देत आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी मुल्लांची मदत मोलाची

रहिमतपूर : ब्रह्मपुरी कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांच्या औषधे व उपचारासाठी शाबिरा मुल्ला यांनी दिलेली आर्थिक मदत दिलासादायक असल्याचे मत रहिमतपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले. सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबीयांच्या वतीने मुल्ला यांनी 25 हजार रुपयांची मदत नगराध्यक्षांकडे सुपूर्त केली. या सेंटरमध्ये रहिमतपूर परिसरातील कोरोना रुग्णांवर पालिकेमार्फत मोफत उपचार केले जात असून शाबिरा मुल्ला व कुटुंबीयांनी चांगला निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांनी कौतुक केले. सध्याच्या कालावधीत मध्यमवर्गीय व गरजू लोकांना उपचारासाठीचा खर्च करणे अशक्‍य झाले असून अशा वेळी समाजातील सर्व स्तरातून संबंधितांना मदत होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे तज्ज्ञ सदस्य रूपेश जाधव, मुख्याध्यापक प्रवीण घाडगे, डॉ. अफरोज मुल्ला, डॉ. अंजुम मुल्ला, इमरान हवालदार, आयुब मुल्ला, फराज मुल्ला आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिका, ऑक्‍सिजन वाहतुकीस मोफत डिझेल

कऱ्हाड : कोरोना रुग्णांना उपचारासाठी नेणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्‍सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दररोज 50 लिटर डिझेल देण्याचा उपक्रम रिलायन्स बीपी मोबिलिटीतर्फे घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी रिलायन्स बीपी मोबिलिटी सामाजिक बांधिलकीतून पुढे आली आहे. त्यांच्यामार्फत देणात येणाऱ्या मोफत इंधाचे पत्र सुनील जाधव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांना दिले. त्यामध्ये त्यांनी जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाच्या वतीने अधिकृत पत्राद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या वाहनांसाठी रिलायन्स मोबिलिटी कंपनीतर्फे दररोज 50 लिटर डिझेल मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

संजय शिर्केंकडून 250 कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप

पाटण : अडूळ येथील संजय शिर्के यांच्या वतीने कोरोना काळात गरजू 250 कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. शिवाजी शिर्के, सचिन शिर्के यांच्या हस्ते हे वाटप झाले. किरकोळ भाजीपाला विक्रेते, सडावाघापूर, जुळेवाडी, निकमवाडी, डाकेवाडी (काळगाव) व अडूळ गावठाण येथील कातकरी कुटुंबांना लॉकडाउन काळात सामाजिक भावनेतून ही मदत केली आहे. त्यांना वैभव साळुंखे, धनाजी केंडे, संजय सत्रे, मनोज शिर्के, विकास शिर्के, सोमनाथ शिर्के, कृष्णकांत शिर्के यांनी सहकार्य केले.

वाढदिनाचा खर्च टाळून निराधारांना मदत

मसूर : कोरोना महामारीत कर्तव्य बजावणारे वायरमन नितीन मांढरे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून नवीन कवठे ग्रामपंचायतीस 20 लिटर सॅनिटायझर, तर निराधार महिलांनाही मदत केली. जुने कवठे व नवीन कवठे येथील निराधार महिलांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किटचे वाटप केले. नितीन मांढरे व शीतल मांढरे यांनी निराधार महिलांना घरी जाऊन जीवनावश्‍यक वस्तू दिल्या. उपसरपंच गणेश घार्गे, सदस्य भिकाजी साळुंखे, अधिकराव यादव, पोलिस पाटील मारुती यादव, धनाजी पाटोळे, विश्वासराव माने, राजाराम यादव, विकास चव्हाण, शंकर ताटे उपस्थित होते.

चव्हाणांतर्फे कोरोनाग्रस्तांना अंडीवाटप

मसूर : पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांनी पार्ले कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सामाजिक बांधिलकीतून अंडी, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. सध्या रुग्णांना अंडीवाटप करण्यात येत नाही. श्री. चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीतून रूग्णांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंडी, पाण्याची बाटलीचे वाटप केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख उपस्थित होत्या.

Various Organizations In Satara District Are Providing Medicine And Financial Help For Corona Patient

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT