Corona Care Center System
सातारा

एकीचे बळ! बोंबाळेत गावकऱ्यांनी उभारले विलगीकरण कक्ष

इतर गावांनीही अशा प्रकारे विलगीकरण कक्ष सुरू केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी माहिती बोंबाळेचे ग्रामस्थ दत्तात्रय घोरपडे यांनी दिली.

धनंजय चिंचकर

कातरखटाव (जि. सातारा) : बोंबाळे (ता. खटाव) हे गाव कोरोना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. सध्या गावात सत्तरहून अधिक बाधित रुग्ण आहेत. बाधितांमध्ये वयोवृद्धांबरोबर तरुणांचीही संख्या वाढत आहे. याच गावातील काही दानशूरांसह काही युवकांनी पुढाकार घेत येथील मराठी शाळेत दहा बेडचे विलगीकरण केंद्र सुरू केले.

शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळेच्या दोन खोल्या ग्रामस्थांनी ताब्यात घेतल्या. दोन खोल्यांमध्ये दहा बेडचे नियोजन केले. एक खोली महिला रुग्णांना, तर एक खोली पुरुष रुग्णांना असे नियोजन केले. बाधित कुटुंबातील रुग्णांना आपल्या घरी विलगीकरणाची सोय नाही, अशा वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

शौचालयास व इतर कामास लागणाऱ्या खर्चाच्या पाण्याची सोय गावातील काही लोकांनी टॅंकरव्दारे केली. बाधित कुटुंबातील लोकांनी बाधित नातेवाईकास जेवणाचा डबा पोच करण्याचा निर्णय घेतला. सरपंच रेश्‍मा निंबाळकर, उपसरपंच बालाजीशेठ निंबाळकर, सदस्य गणेश निंबाळकर, गोरख निंबाळकर, महेश निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, प्रशांत निंबाळकर, दत्तात्रय घोरपडे, अभय शिंदे, प्रदीप निंबाळकर आदींनी पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष सुरू केले. कातरखटावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बोंबाळे उपकेंद्रातील डॉ. मनोज निंबाळकर, डॉ. लीना गुरव, आरोग्य सेविका धोंडुबाई गोसावी, आशा स्वयंसेविका अर्चना नलवडे, नलिनी नलवडे यांच्याकडे या रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी दिली.

इतर गावांतही विलगीकरण कक्ष सुरू करा

गावामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोणी कोणाची काळजी घ्यावी, हेसुद्धा कळत नाही. गावानेच गावकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, या उदात्त हेतूने गावकऱ्यांनी गावातच विलगीकरण कक्ष असावे, असा निर्णय घेतला व तो पूर्णत्वास नेला. इतर गावांनीही अशा प्रकारे विलगीकरण कक्ष सुरू केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी माहिती बोंबाळेचे ग्रामस्थ दत्तात्रय घोरपडे यांनी दिली.

'ग्रामस्थांनाे! कोरोनात तरी राजकारण बाजूला ठेवा'

कोरोनामुक्ती 88.25 टक्‍क्‍यांवर; कऱ्हाडात दाेन टक्केच बाधित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT