सातारा

पोलिसांच्या टेबलवर डोके आपटून वाईत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा)  : मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात येण्यास मनाई करून जामीन दिलेला असताना एक संशयित आरोपी शहरात आला होता. त्याला पकडून चौकशीकामी पोलिस ठाण्यात आणले असता त्याने पोलिस निरीक्षकांच्या टेबलवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापुरी, वाई) असे संशयिताचे नाव आहे.
 
एक महिन्यापूर्वी वाई पोलिसांनी सागरला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने वाई शहरात येण्यास बंदी घालत मनाई आदेश करून त्याचा जामीन मंजूर केलेला होता. मात्र, तो वाईमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस ठाण्याचे गुन्हे अन्वेषणचे श्रावण राठोड व होमगार्ड प्रणित येवले यांना गस्त घालत असताना दुपारी गंगापुरी येथे सागर फिरताना आढळून आला. त्यावर त्यांनी विचारले असता तो त्यांच्यावरच दादागिरी करू लागला.

ठाकरे कुटुंबियांच्या आवडत्या हाॅलिडे डेस्टिनेंशनला मिळाला ब वर्ग दर्जा

तुम्हाला काय कराचेय, कोर्ट व मी बघून घेईन,' असे म्हणाला. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या कक्षामध्ये त्यास विचारपूस करण्यास हजर केले असता, त्याने गोंधळ घालत स्वतःचे डोके टेबलावर आपटले. त्याने अचानक घेतलेल्या पवित्र्याने सगळ्यांची पळापळ झाली. तेथेच असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत.

अनेक आजारांवर भारी, आवळा ठरतोय गुणकारी!

Edited By : Siddharth Latkar सातारा सातारा सातारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT