Water Scarcity esakal
सातारा

तारळे विभागात पाणीबाणी; पुरात अनेक गावच्या पाणी योजना उद्‌ध्वस्त

पुरामुळे अनेक गावच्या पाणी योजना उद्‌ध्वस्त; टँकरवर भागविली जातेय तहान

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : मागील आठवड्यात झालेल्‍या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain in Patan Taluka) आलेल्या महापुरात गावोगावी शेती, रस्ते, पूल, घरे यांची मोठ्या प्रमाणावर पडझड व नुकसान झाले तसेच गावोगावच्या नळ पाणीपुरवठ्याच्या योजनांना देखील फटका बसला आहे. योजनेच्या पाइप, पंप व पंपहउस उद्‌ध्वस्त झाले असून ग्रामस्थांना ओढे, वळचणीवर खर्चाचे तर टँकरवर तहान भागवावी लागत आहे. तारळे विभागात पाणीबाणी (Water Scarcity) करण्याची वेळ महापुरामुळे आली आहे. (Water Scarcity Due To Rain In Tarle village At Karad taluka bam92)

मागील आठवड्यात झालेल्‍या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात गावोगावी शेती, रस्ते, पूल, घरे यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाले आहे.

पावसाचे माहेरघर असलेला पाटण तालुका अन्‌ अतिवृष्टी होत असलेल्या तारळे विभागाला पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत असेल असे सांगून कोणाला पटणार नाही. मात्र, गत आठवड्यातील महापुराने ही वेळ आणली आहे. तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे धरणात विक्रमी आवक झाली, त्याचबरोबर विक्रमी विसर्गदेखील करावा लागला होता. त्याचबरोबर पाऊसही प्रचंड झाल्याने ओढे-नाले तुडुंब भरून वाहिले. परिणामी तारळी नदीला गेल्या ३० वर्षांतील सर्वांत मोठा पूर आला. या पुराने प्रचंड नुकसान केले. बहुतांशी नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना नदीकाठी आहेत. या पुराने त्या उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. अनेक गावांच्‍या नळ योजनेच्या पाइप, पंप व पंपहाउस वाहून गेले आहेत. डोंगरातील गावांच्या योजनांवर दरडी कोसळल्या आहेत.

मोटारी गाळात रुतल्या असून त्या नादुरुस्त झाल्या आहेत, काही मोटारी वाहून गेल्या आहेत. पुराचे पाणी ओसरल्यावर या गोष्टी समोर आल्या आहेत. पाणीपुरवठा विहिरींना मिळालेल्या जलसमाधीमुळे विहिरी गाळ व चिखलाने भरून गेल्या आहेत. या कारणांमुळे गावोगावी पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना ओढे, वळचणी व टँकरवर तहान भागवावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने दुरुस्ती मोहीम हाती घेतली असून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. पांढरवाडी,धनगरवाडी, काटेवाडी, सुंदरनगर, आंबळे, बांबवडे, घोट, करमाळे, चिंचेवाडी, कडवे, भुडकेवाडी, कडवे बुद्रुक, काळकूटवाडी आदी गावांच्या पाणीपुरवठ्याला पुराचा फटका बसला आहे. शिवाय दुरुस्तीसाठीही निधीची तरतूद करावी लागणार आहे. तूर्त या गावांवर पाणीबाणीची वेळ आली आहे.

Water Scarcity Due To Rain In Tarle village At Karad taluka bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT