Satara Politics News esakal
सातारा

NCP : आमदार शिंदेंचा पराभव जिव्हारी लागलाय, त्याचा वचपा जरुर काढणार; रामराजेंची भरसभेत ग्वाही

'शरद पवारांचा स्वाभिमानी जिल्हा उभा करण्यासाठी एकमेकांमधील वाद बाजूला ठेवून शिंदेंना पुन्हा विधानसभेत पाठवू.'

सकाळ डिजिटल टीम

'शरद पवारांचा स्वाभिमानी जिल्हा उभा करण्यासाठी एकमेकांमधील वाद बाजूला ठेवून शिंदेंना पुन्हा विधानसभेत पाठवू.'

अंगापूर (सातारा) : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मोठे फेरबदल पहायला मिळत आहेत. जिल्ह्यात आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा विचार खंडीत करण्याचा चालू असलेला प्रकार पाहिल्यानंतर दुःख वाटतं. परंतु, यशवंत विचारांची पुन्हा नव्यानं मोट बांधून राष्ट्रवादीचा (NCP) स्वाभिमान उभा करू या, असं स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी व्यक्त केलं.

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा विधानसभेतील (Koregaon Assembly Election) पराभवाचा वचपा काढण्यासाठी देगाव इथं लोटलेला जनसमुदाय हा राजकीय जीवनातील भविष्याचा वेध घेणारा ठरेल, असा विश्वासही रामराजेंनी व्यक्त केला. देगांव (ता. सातारा) इथं आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

रामराजे म्हणाले, पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी नाराज होण्याचं कारण नाही. राजकारण, समाजकारणात एकदा वाहून घेतल्यानंतर माघार घेणं योग्य होणार नाही. त्यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून राष्ट्रवादीचा स्वाभिमानी विचार जागृत करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसह जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी उभी करीत शशिकांत शिंदेंच्या पराभवाचा वचपा काढू या, अशी त्यांनी ग्वाही दिली. नवीन कार्यकर्ते तयार करताना पैशाच्या मागं जाणारे नकोत, पैशासाठी सत्ता व राजकारण नको. शरद पवारांचा (Sharad Pawar) स्वाभिमानी जिल्हा उभा करण्यासाठी पुन्हा एकमेकांमधील वाद बाजूला ठेवून त्यांना विधानसभेत पुन्हा पाठवू या. त्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT