Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale esakal
सातारा

भ्रष्टाचारानं बरबटलेला खरा चेहरा उघड करणार; उदयनराजेंचा थेट इशारा

गिरीश चव्हाण

'काही लोकांना सहकार म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता वाटू लागली आहे.'

सातारा : सर्वसामान्य सभासदांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी सहकार चळवळ संपूर्ण देशात रुजली. सहकारी संस्थांच्या माध्यमातून, सभासद जे सहकारी संस्थेचे खरे मालक आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे हे मुख्य सहकार तत्त्व समजले जाते; परंतु काही व्यक्तींनी संस्था सहकारी तत्त्वावर स्थापन केल्या. मालक सभासदांचे जीवनमान उंचावणे सोडाच; पण त्यांना कामगार किंवा वेठबिगार म्हणून वागणूक देत असून, हे स्वतः तथाकथित सहकार सम्राट बनले. सभासदांच्या पैशावर डामडौल आणि मौजमजा करत आहेत. अशा लोकांचा बुरखा फाडून, भ्रष्टाचाराने बरबटलेला खरा चेहरा उघड करण्याची आता वेळ आल्याचा इशारा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धी पत्रकात खासदार भोसले म्हणाले, ‘‘सहकारी संस्था चालवताना, तोट्यात दाखवायच्या, कालांतराने मोडकळीस आणून त्या सहकारी संस्था आपणच विकत घेऊन, गिळंकृत करताना, खासगी करायच्या अशी एक प्रथाच महाराष्ट्रात रूढ झाली आहे. त्याविरुद्ध कोण आवाज उठवत असेल तर त्याला नाहक त्रास द्यायचा असे सुडाचे राजकारण सुरू आहे. गेली कित्येक वर्षे समाजकारण, राजकारण करताना फक्त लोकांच्या विकासाचा व कामांचा विकास केला. हे करत असताना टीका, टिप्पणी होत राहिल्या याचा आम्ही कधी विचार केला नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आम्ही शत्रू कोणालाही समजत नाही, सर्वांना मित्र समजतो; परंतु आम्ही आजपर्यंत तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही आणि भविष्यात करणारही नाही.’’

दरम्यान, काही लोकांना सहकार म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता वाटू लागली आहे; परंतु सहकारी संस्था याच गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. हेच सभासद खऱ्या अर्थाने त्या संस्थांचे मालक आहेत. सभासदांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थापन केलेल्या या सहकारी संस्था आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. मालक असलेल्या सभासद शेतकऱ्यांना, कोण सहकाराच्या माध्यमातून कामगार समजून त्रास देणाऱ्यांना, जशाच तसे उत्तर द्यावे. या मालक- सभासदांनी अशा संस्था आता ताब्यात घेणे गरजेचे आहे, असे खासदार भोसले यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT