The accused woman clerk caught by ACB after accepting ₹5,000 bribe in Satara office. Sakal
सातारा

धक्कादायक! 'साताऱ्यात लाचप्रकरणी महिला लिपिकाला अटक'; हुकूमनामा मुद्रांकितसाठी घेतले पाच हजार, जिल्ह्यात उडाली खळबळ

Satara Bribery Case: पल्लवी रामदास गायकवाड-कारंडे (रा. पुसेगाव, ता. खटाव) असे संबंधित कनिष्ठ लिपिक महिलेचे नाव आहे. याबाबत तक्रारदाराने काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित मिळकतीबाबत बहीण-भावामध्ये येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता.

सकाळ वृत्तसेवा

सातारा: बहीण-भावामध्ये न्यायालयात झालेल्या तडजोडीचा हुकूमनामा मुद्रांकित करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

पल्लवी रामदास गायकवाड-कारंडे (रा. पुसेगाव, ता. खटाव) असे संबंधित कनिष्ठ लिपिक महिलेचे नाव आहे. याबाबत तक्रारदाराने काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित मिळकतीबाबत बहीण-भावामध्ये येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता. या दाव्यामध्ये भाव-बहिणीमध्ये तडजोड झाली होती. त्याबाबतचा हुकूमनामा त्यांनी नोंदीसाठी सैदापूर येथील तलाठी कार्यालयात सादर केला होता.

त्या वेळी तलाठी यांनी तो हुकूमनामा मुद्रांकित करून आणण्यास सांगितले होते. तलाठ्याच्या सांगण्यानुसार त्यांनी तो हुकूमनामा मुद्रांकित करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज चुकविलेला मुद्रांक शुल्क या कामाचा पदभार असलेल्या गायकवाड यांच्याकडे गेला होता.

हे काम करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार आज पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गायकवाड यांना पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे, निरीक्षक सुनील पाटील, हवालदार राजपुरे, थोरात, महिला हवालदार जाधव, गुरव हे सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Jasprit Bumrah: कसे असेल बुमराचे भवितव्य, आशिया कपमध्ये खेळणार नाही? गंभीर - आगरकरसमोर मोठं आव्हान

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: शेकापच्या मेळाव्यात संजय राऊत-राज ठाकरे एकत्र

Malegaon Crime : मालेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट! किरकोळ वादातून तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT