सातारा

माजगावला उरमोडी नदीत आढळला महिलेचा मृतदेह

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आज सकाळी माजगाव (ता. सातारा) येथील उरमोडी नदीच्या पात्रात सापडला. सुशीला विलास पाटोळे 
(वय 40) असे या महिलेचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशीला पाटोळे या आपल्या मुलासह गेल्या पाच वर्षांपासून नागठाणे येथे माहेरी आई-वडिलांकडे वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी चार वाजता शौचास जाऊन येते, असे सांगून त्या घरातून बाहेर पडल्या. बराच वेळ झाले तरी त्या घरी न परतल्यामुळे घरातील लोकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर त्यांचे भाऊ प्रकाश विनायक बोडरे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात हरविल्याबाबतची नोंद दाखल केली होती. गेले दोन दिवस नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. 

आज सकाळी माजगाव गावच्या हद्दीत उरमोडी नदीपात्रात त्यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला. याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास हवालदार बाजीराव पायमल हे करत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT