सातारा

पाटणमध्ये साकव पुलांची कामे निकृष्ट, 'ठेकेदार-बांधकाम'ची संगनमताने सुरु आहे लूट!

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील साजूर ते हेळवाक रस्त्यावरील ओढ्यांवर बांधलेल्या साकव पुलांपैकी किमान दहा पुलांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, ही विकासकामे निधीच्या ऱ्हासाला करणीभूत ठरली आहेत. संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार पाटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

साजूर ते हेळवाक रस्त्यामुळे साजूर, तांबवे, गारवडे, बहुले, पापर्डे, नाटोशी, मणेरी, हेळवाक या साररख्या छोट्या-मोठ्या गावांची वाहतुकीची गैरसोय दूर झाली. पूर्वी या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत होते. निधीअभावी रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. केंद्राकडूनही या रस्त्याला भरघोस असा निधी मंजूर झाल्याने रस्त्याच्या कामाबरोबर साकव पुलांची कामे झाली. मात्र, रस्त्यावरील ओढ्यांवरील साकव पुलांपैकी किमान दहा पुलांची कामे सुमार आहेत. ठेकेदारांनी कामे पूर्ण केलेली नाहीत. पुलांना संरक्षक कठडे नाहीत. पुलाठिकाणी खणलेली जागा तशीच आहे. साहित्य जागेवर पडून असल्याने वाहतुकीस अडचण होत आहे. काही ठिकाणी काम पूर्ण होण्याअगोदर ठेकेदारांची बिले अदा झाली आहेत. 

नवारस्ता ते ढेबेवाडी घाटात नव्याने बांधलेल्या साकव पुलामध्ये व सरंक्षक कठड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडांचा वापर करून सिमेंट खडीचे प्रमाण कमी केले आहे. नव्याने केलेली ही कामे किती दिवस टिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निकृष्ट कामाबाबात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. संबंधित ठेकेदार व बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार पाटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सुरू असून, या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

साजूर ते हेळवाक रस्त्यावर कुसरूंड जवळील सुतारवस्ती येथे साकव पुलाचे काम नव्याने करण्यात आले असून, ते काम अपूर्ण आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आम्ही ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे. 

-मधुकर शिंदे, ग्रामस्थ, कुसरूंड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT