Wai Police Crime News esakal
सातारा

Crime News : प्रेम प्रकरणातून 20 वर्षाच्या युवकाचा घोटला गळा; परखंदीत अभिषेकची निर्घृण हत्या

युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून खानापुरात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे.

भद्रेश भाटे

परखंदी गावातील (Parkhandi Village) काही नागरिक हे शेताकडं जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला.

वाई (सातारा) : परखंदीच्या शिवारात सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच, वाई पोलीस (Wai Police) घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

मृतदेहाची ओळख पोलिसांनी लगेच पटवली असून खून झालेला युवक हा खानापुरातील अभिषेक रमेश जाधव (वय 20) याचा असल्याचं समोर आलंय. घटनास्थळी वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळं वाई तालुक्यात खळबळ उडालीये.

प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीये. दरम्यान, खानापूरमध्ये (Khanapur) तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळी परखंदी गावातील (Parkhandi Village) काही नागरिक हे शेताकडं जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब लगेच वाई पोलिसांना सांगितली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम घटनास्थळी पोहोचली.

Wai Police Crime News

त्यांनी मृतदेहाबाबत चौकशी केली असता व काही मृतदेहाच्या जवळील कागदपत्रावरून युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचं समोर आलं. मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी सातारा इथं नेण्यात आला, मात्र युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळं खानापूर इथं प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तिथंही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अद्यापही या खून प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर हेही दाखल झाल्याचे समजतं. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. त्याच्या मोबाईल लोकेशन वरून शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT