youth Kenjal village committed suicide esakal
सातारा

Satara Crime : लग्नाला अवघे दोन दिवस असताना तरुणानं घेतला गळफास; टोकाचं पाऊल उचलल्यानं चर्चांना उधाण

केंजळ (ता. वाई) येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी मृतदेह खाली सोडवून कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. राहुल यांचे १२ जूनला लग्न होते.

भुईंज : केंजळ (ता. वाई) येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नाला अवघे दोन दिवस उरल्याने टोकाचे पाऊल उचलल्याने केंजळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल सुरेश जगताप (वय ३२) याने काल सकाळी केंजळ येथील भट नावाच्या शिवारातील वेताळबा ओढ्यातील वडाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब गावातील अनिकेत जगताप यांच्या निदर्शनास आली. त्याने लागलीच कुटुंबीयांना व पोलिस पाटील यांना कळविले.

त्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली सोडवून कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. राहुल यांचे १२ जूनला लग्न होते. त्यासाठी त्याने भुईंज पोलिस ठाण्यात बँडचा रीतसर परवाना घेतला होता.

आज अचानक राहुलने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात (Bhuinj Police Station) झाली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पुष्पलता धायगुडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT