सायगाव (जि. सातारा) : सुरपाट्या हा एक महाराष्ट्राच्या मातीतला शिवकालीन ग्रामीण खेळ अलीकडे मोबाईल, इंटरनेटमुळे तरुण पिढी विसरू लागली आहे. करंजे (ता. सातारा) येथील उच्चशिक्षित तरुणांनी भावी पिढीला व्यायामाचे महत्त्व पटवून देत या खेळाची शिकवणी सुरू केली आहे.
अलीकडे मैदानी खेळांमध्ये व्यावसायिक खेळांना प्राधान्य आल्याने गावाकडचे खेळ काहिसे मागे पडले आहेत. परंतु, तरीही या खेळांनी अनेकांचे बालपण समृद्ध केले आहे. सुरपाट्या हा खेळही त्यापैकीच एक आहे. गोट्या, लगोर, सुरपाट्या, टायर पळविणे, विटी-दांडू, सुरपारंब्या, हंटरपाणी, अंडापाणी, शिवनापाट, पाण्यातली शिवानापाणी यांसारखे खेळ आजच्या तरुणांना माहितही नसतील. अशा वेळी या खेळांचे नाव जरी काढले तरी अनेकांना आपले बालपण आठवते.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातही या खेळांबाबत उल्लेख आढळतो. साताऱ्याचे नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, तानाजी किर्दत, तसेच आनेवाडीचे सुहास फरांदे व डॉ. विकास फरांदे यांनी रोज संध्याकाळी सुरपाट्या हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. प्रारंभी प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मात्र या खेळाचे फायदे पाहून या ठिकाणी हा खेळ खेळण्यास मुलांची गर्दी होत आहे.
हा खेळ खेळल्यामुळे तरुणांचा छान व्यायाम होत आहे. पालकही मुले खेळू लागल्याने खुश आहेत. ग्रामीण भागातही या खेळाचा प्रसार करणार आहोत.
- सुहास फरांदे, प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग
Edited By : Siddharth Latkar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.