BSNL Recharge Plan
BSNL Recharge Plan Sakal
विज्ञान-तंत्र

1000GB डेटा अन् मोफत कॉलिंग फक्त 329 रुपयांमध्ये; 'या' कंपनीचा खास प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने इंटरनेटची वाढती गरज लक्षात घेऊन 329 रुपयांचा फायबर ब्रॉडबँड प्लान लॉन्च केला आहे. यापूर्वी 449 रुपयांचा प्लॅन (Recharge Plan) हा BSNL चा सर्वात किफायतशीर फायबर ब्रॉडबँड पर्याय होता. परंतु आता मात्र त्यापेक्षाही स्वस्त आणि मस्त प्लॅन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 329 रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकेल. 329 रुपयांची प्लॅन केवळ देशातील निवडक राज्यांमधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हा प्लॅन तुमच्या राज्यात उपलब्ध आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला BSNL भारत फायबरच्या वेब पेजला भेट द्यावी लागेल.

BSNL 329 रुपयांच्या फायबर ब्रॉडबँड प्लॅनचे फायदे-

BSNL च्या 329 रुपयांच्या फायबर ब्रॉडबँड प्लॅनसह, वापरकर्त्यांना 20 Mbps इंटरनेट स्पीड मिळते. यासोबतच त्यांना 1000GB किंवा 1TB इंटरनेट डेटा आणि मोफत फिक्स्ड लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळते. BSNL या प्लॅनसह पहिल्या महिन्याच्या बिलावर 90% सूट देण्याचे आश्वासन देत आहे.

कंपनीने ऑफर केलेल्या 449 रुपयांच्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन फार वेगळा नाही. परंतु ज्यांना स्वतःच्या वापरासाठी फायबर इंटरनेट कनेक्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमधील 1000GB डेटा एका व्यक्तीसाठी पुरेसा ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT