Google Pixel 6a
Google Pixel 6a esakal
विज्ञान-तंत्र

Google Pixel 6a वर 12 हजार रुपयांची सूट, डील पाहून मन में फुटेगा लड्डू

सकाळ डिजिटल टीम

Google Pixel 6a : जर तुम्हालाही Google ब्रँडचे Pixel स्मार्टफोन्स आवडत असतील, तर Google च्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर 12,000 रुपयांची बंपर सूट दिली जात आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करताना तुम्ही सवलतीचा लाभ घेऊ शकता. या डीलचा फायदा तुम्हाला कसा मिळेल ते समजून घ्या.

Google Pixel 6a वर बंपर सूट

गुगलने हा फ्लॅगशिप फोन गेल्या वर्षी जुलैमध्ये 43 हजार 999 रुपयांना लॉन्च केला होता, मात्र आता गुगल पिक्सेल 6A फ्लिपकार्टवर 27 टक्के डिस्काउंटनंतर 31 हजार 999 रुपयांना विकला जात आहे. याचा अर्थ असा की गुगलचा हा फ्लॅगशिप फोन लाँचच्या किमतीपेक्षा 12 हजार रुपये स्वस्त आहे. Google Pixel 6A सह Flipkart वर उत्पादन सूट व्यतिरिक्त अनेक ऑफर देखील दिल्या जात आहेत. या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही अतिरिक्त पैसे वाचवू शकता.

flipkart ऑफर

तुम्हाला 12,000 रुपयांच्या उत्पादन सूट व्यतिरिक्त अतिरिक्त बचत करायची असेल, तर कोटक बँक क्रेडिट कार्डच्या EMI व्यवहारावर 10 टक्के (रु. 1000 पर्यंत) बचत होईल. याशिवाय फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक, HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 1000 रुपयांची सूट मिळू शकते.ग्राहकांसाठी नो कॉस्ट ईएमआय सुविधा देखील उपलब्ध आहे. 3 हजार 556 रुपये प्रति महिना पासून ईएमआयचा पर्याय देखील दिला जातोय.

Google Pixel 6a चे तपशील

फोनचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे आणि या डिव्हाइसमध्ये 6.1-इंच फुल एचडी प्लस रिझोल्यूशन स्क्रीन आहे. हँडसेट मध्ये गुगल टेन्सर चिपसेट आहे. फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, 12 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. Pixel 6A मध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT