Tibet Glacier Virus
Tibet Glacier Virus  eSakal
विज्ञान-तंत्र

Tibet Glacier Virus : तिबेटमधील ग्लेशिअर वितळले अन् बाहेर आले हजारो वर्षांपूर्वीचे विषाणू.. भारताला मोठा धोका?

Sudesh

Ancient Virus found in Tibet Glaciers : एकीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भीती कमी झालेली नसतानाच, भारतासमोर आणखी एक मोठं संकट उभं ठाकण्याची शक्यता आहे. तिबेटमधील काही हिमनद्या वितळू लागल्या आहेत. यामुळे हजारो वर्षांपूर्वी बर्फात अडकलेले विषाणू आता समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी रशियामध्ये असा 40 हजार वर्षांपूर्वीचा विषाणू मिळाला होता. मात्र, आता भारतापासून अघदी जवळ असा विषाणू मिळाल्यामुळे शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

तिबेटच्या पठाराजवळ असणाऱ्या गुलिया आइस कॅपजवळ (Guliya Ice Cap) शास्त्रज्ञांना 15 हजार वर्षांपूर्वीचे विषाणू मिळाले आहे. विशेष म्हणजे याठिकाणी एकाच नव्हे तर अनेक प्रकारचे विषाणू (Tibet Virus) मिळाले आहेत. यातील कित्येक विषाणू अजूनही जिवंत असल्याची माहिती ओहायो स्टेट युनिवर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट झी-पिंग झॉन्ग यांनी दिली. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

33 विषाणू, 28 अज्ञात..

समुद्रसपाटीपासून सुमारे 22 हजार फूट उंचीवर हे विषाणू मिळाले आहेत. शास्त्रज्ञांना याठिकाणी 33 प्रकारचे विषाणू मिळाले. यातील 28 विषाणूंबाबत वैज्ञानिकांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. म्हणजेच या विषाणूंचे संक्रमण झाल्यास त्यावर कोणतंही औषध उपलब्ध नाही. (Unknown Bacteria in Tibet)

कोणत्याही गोष्टीचा परिणाम नाही

ओहायो विद्यापीठातील दुसरे वैज्ञानिक मॅथ्यू सुलिवन यांनी म्हटलं, की हे विषाणू अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही तग धरून राहिले आहेत. हजारो वर्षे बर्फाखाली दबले जाऊनही त्यांच्यावर कोणता परिणाम झालेला नाही. कोणत्याही प्रकारचं वातावरण या विषाणूंवर परिणाम करू शकत नाही, त्यामुळे यांवर कशाचाच परिणाम होत नाही. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. (Tibet Bacteria found in Glacier)

बॅक्टेरियाच्या प्रजाती

गेल्या वर्षीदेखील तिबेटच्या ग्लेशिअरमधून सुमारे 1000 प्रकारचे बॅक्टेरिया मिळाले होते. हे ग्लेशिअर वितळले तर त्याचं पाणी भारत आणि चीनच्या नद्यांमध्ये मिसळणार आहे. हे बॅक्टेरिया मिश्रित पाणी प्यायल्याने विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे ग्लेशिअर वितळण्याचा वेगही वाढला आहे. भारत, चीन आणि म्यानमार अशा देशांसाठी हा भविष्यात धोका ठरू शकतो असं मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT