GTA 6 Hacker eSakal
विज्ञान-तंत्र

GTA 6 Hacker : 18 वर्षाच्या हॅकरने लावला टेक कंपन्यांना सुरूंग; आता आयुष्यभरासाठी रुग्णालयात होणार कैद

न्यायाधीशांनी असं म्हटलं, की कुर्तज हा सायबर गुन्हे करण्यासाठी उत्सुक आणि प्रेरित आहे. त्याची हॅकिंगची क्षमता एवढी खतरनाक आहे, की तो सामान्यांसाठी मोठा धोका ठरू शकतो.

Sudesh

GTA VI Hacker Ordered To Life In Hospital : सध्या GTA 6 या गेमची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याला कारण म्हणजे, या गेमचे व्हिडिओ लीक करणाऱ्या हॅकरला शिक्षा सुनावण्यात आली आहे. केवळ रॉकस्टार गेम्सच नाही, तर इतरही काही टेक कंपन्यांना या हॅकरने लक्ष्य केलं होतं. लंडन पोलिसांनी गेल्या वर्षी या तरुणाला अटक केली होती.

एरियन कुर्तज (Arion Kurtaj) असं या हॅकरचं नाव आहे. अवघ्या 18 वर्षाच्या या हॅकरने 'रॉकस्टार गेम्स'च्या ग्रँड थेफ्ट ऑटो (Grand Theft Auto 6) या गेमच्या सुमारे 90 व्हिडिओ क्लिप्स चोरून लीक केल्या होत्या. या प्रकरणात आणखी एका 17 वर्षांच्या हॅकरला दोषी ठरवण्यात आलं होतं. या हॅकरची ओळख पटू शकली नाही. या दुसऱ्या हॅकरने EE आणि Nvidia या कंपन्यांनाही लक्ष्य केलं होतं.

रॉकस्टारच्या (Rockstar Games) या नव्या गेमची प्रतिक्षा जगभरातील गेमर्स गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. 2025 साली ही गेम लाँच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, गेल्या वर्षी लीक झालेल्या व्हिडिओंमुळे कंपनीला कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान झालं होतं.

या प्रकरणाच्या तपासामध्ये FBI देखील सहभागी झालं होतं. यामुळेच उबर, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, सॅमसंग, एनव्हिडिया आणि ओक्टा अशा मोठमोठ्या कंपन्यांवर झालेले सायबर हल्लेदेखील (Cyber Attacks) समोर आले. हे सर्व हल्ले याच हॅकरच्या ग्रुपने केल्याचंही स्पष्ट झाल्याची माहिती IGN वेबसाईटने दिली आहे. (Gaming News)

कुर्तज किती धोकादायक?

कुर्तज हा Lapsus$ नावाच्या एका हॅकिंग ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपने केलेल्या हल्ल्यांमुळे वर उल्लेख केलेल्या कंपन्यांना सुमारे 10 मिलियन डॉलर्सचं नुकसान झाल्याची माहिती बीबीसीने दिली आहे. विशेष म्हणजे, कुर्तजने जेव्हा GTA VI गेमच्या क्लिप्स लीक (GTA 6 Leak) केल्या तेव्हा तो जामीनावर बाहेर आला होता. आधीच एका सायबर गुन्हेगारी प्रकरणात तो शिक्षा भोगत होता.

केवळ अमेझॉन फायरस्टिक, हॉटेलमधील टीव्ही आणि आपला मोबाईल फोन एवढ्याच गोष्टींच्या मदतीने त्याने रॉकस्टारचे सर्व्हर्स हॅक केले होते. त्याने रॉकस्टार कंपनीला धमकी देखील दिली होती, की त्यांनी जर त्याला पैसे दिले नाहीत तर तो सोर्स कोडही लीक करेल.

आयुष्यभरासाठी कैद

कुर्तजच्या वकिलांनी दावा केला होता, की त्याला ऑटिस्टिक-स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा आजार असल्यामुळे त्याला तुरुंगात पाठवू नये. याला न्यायाधीशांनी देखील होकार दर्शवला.

मात्र, न्यायाधीशांनी असंही म्हटलं, की कुर्तज हा सायबर गुन्हे करण्यासाठी उत्सुक आणि प्रेरित आहे. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर सायबर गुन्हेगारीकडे वळण्याचा त्याचा मानस आहे. त्याची हॅकिंगची क्षमता एवढी खतरनाक आहे, की तो सामान्यांसाठी मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे, त्याला आयुष्यभरासाठी रुग्णालयामध्ये कैद ठेवण्यात यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT