joy e bike launched 3 new high speed electric scooters wolf plus gen next nanu plus and del go check price
joy e bike launched 3 new high speed electric scooters wolf plus gen next nanu plus and del go check price  
विज्ञान-तंत्र

तीन नवे हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच, एका चार्जमध्ये धावतात 100km

सकाळ डिजिटल टीम

Electric Scooter Launch : जॉय ई-बाईकने भारतात तीन Wolf+, Gen Next Nano+ आणि Del Go या इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केल्या आहेत. कंपनीची Del Go हे डिलिव्हरी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तर इतर दोन कंपनीने हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून लॉन्च केले आहेत.

किंमत किती आहे?

Wolf+ इलेक्ट्रिक स्कूटर मॅट ब्लॅक, स्टारडस्ट ग्रे आणि डीप वाईन रंगांमध्ये मिळेल. तसेच त्याची किंमत ही 1,10,185 रुपये (एक्स-शोरूम) आहे. Gen Next Nano+ मिडनाईट ब्लॅक आणि मॅट व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येतो आणि तुम्हाला ते खरेदी करण्यासाठी 1,06,991 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

तर Del Go बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने याची किंमत 1,14,500 रुपये (एक्स-शोरूम) आहे. महत्वाचे म्हणजे या किंमती FAME II अनुदानासह आहेत. जॉय ई-बाईकच्या या नवीन स्कूटर्सचे बुकिंग आजपासून सुरू असून कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर तीन वर्षांची वॉरंटीही देत ​​आहे.

कंपनीचे वुल्फ+ इलेक्ट्रिक स्कूटर टुरिंग डिझाइनसह येते, ज्यामध्ये वुल्फ+, जेन नेक्स्ट नानू+ आणि डेल गो चे फीचर्स आहेत याचा व्हीलबेस 1345mm आणि सीटची उंची 740mm आहे. त्याच वेळी, Gen Next Nano+ च्या सीटची उंची 730mm आणि व्हीलबेस 1325mm आहे. Gen Next Nano+ हे कंपनीने खास तरुण पिढीसाठी डिझाइन केले आहे. दोन्ही स्कूटरच्या पुढील बाजूस ड्युअल फोर्क हायड्रॉलिक सस्पेंशन सेटअप देण्यात आला आहे. त्याच वेळी, कंपनी त्यांच्या मागील बाजूस मोनो शॉक सस्पेंशन देत आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि रेंज

कंपनीच्या या लेटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर 160mm च्या ग्राउंड क्लीयरन्स आणि 1.6mm च्या टर्निंग रेडियससह येतात. Dell Go बद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या सीटची उंची 820mm आणि व्हीलबेस 1315mm आहे. यात सिंगल स्क्रीन डिटेल डॅशबोर्ड डिस्प्ले देखील आहे. तुम्हाला स्कूटरमध्ये कीलेस स्टार्ट/स्टॉप सुविधा मिळेल. विशेष बाब म्हणजे या स्कूटरमध्ये दिलेले सेन्सर जॉय ई-कनेक्ट अॅपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात.

आरामदायी राइडींग अनुभवासाठी तुम्हाला इको, स्पोर्ट्स आणि हायपर राइडिंग मोड देखील मिळतील. यासोबतच कंपनी या दोन्ही ई-स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड देखील देत आहे, जे पार्किंगच्या वेळी अतिशय उपयुक्त आहेत. कंपनीची डेल गो डिलिव्हरी ई-स्कूटर जीपीएस सेन्सिंग, रिअल टाईम पोझिशन आणि जिओ फेन्सिंग फीचर्सने सुसज्ज आहे आणि याच्या मदतीने स्कूटरला सहज ट्रॅक करता येते. या स्कूटरसोबत कंपनीला एक स्मार्ट रिमोट देखील मिळतो. हे फीचर Wolf+ आणि Nano+ मध्ये देखील उपलब्ध आहे. स्कूटर्सना रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम मिळते, जे ब्रेक लीव्हर ओढल्यावर बॅटरी चार्ज करते.

बॅटरी

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेली बॅटरी 60V35Ah आहे. पोर्टेबल असल्याने ही बॅटरी कुठेही चार्ज करता येते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी 100 किमी पर्यंतची रेंज देते. स्कूटरमध्ये 1500W मोटर दिल्या आहेत जी 20Nm टॉर्क आणि 55kmph ची टॉप स्पीड देते. स्कूटरमध्ये बसवलेले ट्विन डिस्क ब्रेक इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीमला जोडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे ब्रेकिंगही चांगले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT