5G Spectrum sakal
विज्ञान-तंत्र

5G in India : 5G लॉंचनंतर लोकांच्या खिशावर भार वाढणार, जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

5G in India : 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपल्यानंतर देशातील दोन्ही मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी 5G नेटवर्क लॉन्चिंगची तयारी सुरू केली आहे. एअरटेल आणि जिओ या महिन्यापासून 5G सेवा सुरू करू शकतात, असे सांगितले जात आहे. 5G सेवेबाबत इतरही अनेक प्रकारच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. या सगळ्या दरम्यान, एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे 5G चा आनंद घेण्यासाठी, तुम्हाला 5G सर्व्हिस असलेला स्मार्टफोन अवश्यक असेल. त्यामुळे 5G सुरू होताच तुम्हाला फोन अपग्रेड करावा लागेल.

भारतात फक्त 98 टक्के लोकांकडे 5G फोन आहेत. म्हणजेच हे लोक अजूनही 4G सेवा असलेले फोन वापरत आहेत. या सेवेसाठी फक्त नवीन 5G सिम देखील घ्यावे लागेल असेही सांगितले जात आहे. मात्र, आतापर्यंत टेलिकॉम कंपन्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

फक्त 2 टक्के लोकांकडे 5G फोन

एका सर्वेक्षणानुसार, भारतात 100 कोटींहून अधिक मोबाइल ग्राहक आहेत. यामध्ये केवळ 2 टक्के लोकांकडे 5G सेवा असलेले फोन आहेत, म्हणजेच 98 टक्के लोक अजूनही 4G सर्व्हिस असलेले फोन वापरत आहेत. अशा परिस्थितीत, जर या लोकांना 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना लगेच 5G सर्व्हिस असलेले स्मार्टफोन घ्यावे लागतील त्यासाठी 15 हजारांपेक्षा कमी किमतीत काही चांगले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, देशात टेलीकॉम बेस स्टेशन्सची झपाट्याने वाढ झाली आहे. 2014 मध्ये, 2022 पर्यंत त्यांची संख्या 400% पर्यंत वाढली आहे. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की 5G साठी ज्या प्रमाणात टेलिकॉम कंपन्यांची तयारी दिसून येत आहेत त्या प्रमाणात सामान्य जनता तयार नाही, कारण 15 हजार खर्च करून 5G फोन घेतल्यानंतरच त्यांना 5G सर्व्हिसचा आनंद घेण्यासाठी जनतेला थोडे प्रयत्न करावे लागतील. दोन वर्षांपूर्वी 5G फोन बाजारात उपलब्ध होते, त्यानंतरही केवळ 2 टक्के लोकांकडेच त्याचा एक्सेस आहे. या परिस्थितीत, भारतातील प्रत्येक प्रदेशात 5G चा मार्ग सोपा होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT