5g smartphone shipments grew more than 600 percent may reach 64 million in india 2022  
विज्ञान-तंत्र

5G स्मार्टफोनची मागणीत तुफान वाढ; सॅमसंग आघाडीवर, पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

सध्या जवळपास सर्व कंपन्या त्यांचे 5G स्मार्टफोन (5G Smartphone) लॉंच करत आहेत. तसेच या 5G स्माकर्टफोनची मोठ्या प्रमाणात विक्री देखील होत आहे. यासंबंधीची आकडेवारी नुकतीच समोर आली असून 2021 मध्ये, भारतात 5G स्मार्टफोन शिपमेंटमध्ये वर्षिक 600% पेक्षा जास्त वाढ झाली. कॅलेंडर वर्ष 2021 च्या अखेरीस, भारतात स्मार्टफोनची एकूण शिपमेंट 16.6 कोटी युनिट्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. त्याच वेळी, स्मार्टफोनची कमाई $ 37 बिलियनवर पोहोचली आहे. 2021 च्या चौथ्या तिमाहीसाठी CMR च्या इंडिया मोबाइल हँडसेट मार्केट रिव्ह्यू रिपोर्टमध्ये ही माहिती सांगण्यात आली आहे.

सॅमसंग

5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे 2021 च्या चौथ्या तिमाहीत, सॅमसंग 5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आघाडीवर होता. सॅमसंगचा मार्केट शेयर 23 टक्के होता. त्याच वेळी, अॅपलचा मार्केट शेयर 14 टक्के राहिला. 2021 च्या चौथ्या तिमाहीत, Xiaomi 21 टक्के शेअरसह स्मार्टफोन लीडरबोर्डमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी रियलमी 17 टक्के शेअरसह दुसऱ्या तर सॅमसंग16 टक्के शेअरसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर या यादीत विवो आणि ओप्पोचा क्रमांक लागतो.

Apple चे हे सर्वात यशस्वी वर्ष

Apple च्या शिपमेंटमध्ये वार्षिक 31 टक्के वाढ झाली. 2021 हे वर्ष Apple साठी सर्वात यशस्वी वर्षांपैकी एक आहे. सुपर प्रीमियम सेगमेंटमध्ये (रु. 50,000 ते रु. 1 लाख रेंज), Apple 81 टक्के शेअरसह आघाडीवर आहे. 2021 मध्ये Appleचा एकूण महसूल सुमारे $5 अब्ज इतका आहे. CMR चा अंदाज आहे की कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये स्मार्टफोन शिपमेंट दरवर्षी 15-18 टक्क्यांनी वाढू शकते.

यंदा 64 मिलीयन होण्याची शक्यता

CMR दावा केला आहे की, 2022 वर्षाच्या उत्तरार्धात पाहिल्या सहा महिन्यांपेक्षा परिस्थिती सुधारेल. CMR चा अंदाज आहे की 5G स्मार्टफोनची शिपमेंट सुमारे 64 मिलीयन इतकी असू शकते. त्याच वेळी, स्मार्टफोनची एकूण शिपमेंट 190 मिलीयनचा टप्पा पार करेल. 2021 मध्ये परवडणाऱ्या स्मार्टफोनची शिपमेंट (7000 रुपयांच्या खाली) कमी झाली आहे, तर प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

SCROLL FOR NEXT