5G upgrade
5G upgrade  google
विज्ञान-तंत्र

5G upgrade : मोबाईलचं SIM 5Gमध्ये अपग्रेड करताय ? बँक खात्यातील पैसे होतील गायब

नमिता धुरी

मुंबई : देशात 5G सेवा सुरू झाली आहे. Reliance Jio आणि Airtel च्या 5G सेवा काही शहरांमध्ये लाइव्ह झाल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी सारख्या शहरांतील वापरकर्त्यांना 5G सिग्नल मिळू लागले आहेत.

जिओची 5G सेवा बीटा ट्रायल अंतर्गत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी येथे सुरू झाली आहे तर Airtel ची 5G सेवा Airtel 5G Plus नावाने आठ शहरांमध्ये सुरू झाली आहे. आता 5G सुरू झाल्याने सायबर चोरही सक्रिय झाले आहेत.

5G सिम अपग्रेड नावाच्या लिंकवर क्लिक करताच लोकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत. या संदर्भात पोलिसांनी लोकांना सावधही केले आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेऊ या....

ABPlive (तेलुगू) च्या वृत्तानुसार, 5G सिम अपग्रेडबाबत अनेकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. 5G सिम अपग्रेडच्या नावाने आलेल्या मेसेजच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा लोकांचा दावा आहे. लोकांना वाटत आहे की त्यांच्या टेलिकॉम कंपनीने सिम अपग्रेड करण्यासाठी लिंक पाठवली आहे.

खरं तर, सायबर चोर लोकांच्या 5G बद्दलच्या उत्साहाचा फायदा घेत आहेत. हॅकर्स लोकांचे फोन हॅक करत आहेत आणि संदेशासोबत आलेल्या लिंकद्वारे डेटा चोरत आहेत. हे चोरटे लोकांच्या फोनमध्ये रिमोट अॅप इन्स्टॉल करून नंतर फोन कंट्रोल करत आहेत.

पोलिसांच्या सायबर टीमने लोकांना अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्यास सांगितले आहे ज्यामध्ये 4G वरून 5G वर अपग्रेड करण्याची चर्चा आहे. याशिवाय, आम्ही तुम्हाला सांगतो की, टेलिकॉम कंपन्यांनी असेही म्हटले आहे की तुम्हाला सिम बदलण्याची किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही.

5G Realme, Xiaomi, Motorola, Samsung सारख्या सर्व कंपन्यांच्या 5G फोनला सपोर्ट करत आहे, तथापि आयफोन वापरकर्त्यांना आता प्रतीक्षा करावी लागेल, कारण यासाठी Apple कडून अपडेट जारी केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT