Delv AI Company eSakal
विज्ञान-तंत्र

Delv AI Company : 16 वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीने उभारली 'एआय' कंपनी; कोट्यावधींची करते उलाढाल

प्रांजली अवस्थीने Delv.AI नावाची एक स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे.

Sudesh

सध्या सगळीकडे एआयची चर्चा सुरू आहे. अशातच एका 16 वर्षाच्या भारतीय विद्यार्थिनीने कोट्यवधींची एआय कंपनी उभारून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. प्रांजली अवस्थी नावाच्या या मुलीची चर्चा सध्या सगळ्या जगात सुरू आहे.

प्रांजली अवस्थीने Delv.AI नावाची एक स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. या कंपनीमध्ये 10 लोक काम करतात, आणि याचं मार्केट इव्हॅल्युएशन तब्बल 12 मिलियन डॉलर्सहून अधिक आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तिने ही कंपनी सुरू केली होती, आणि आतापर्यंत तिला 3.7 कोटी रुपयांची फंडिंग मिळाली आहे.

प्रांजलीने मियामी टेक वीक या कार्यक्रमात आपल्या कंपनीची माहिती दिली. 2022 च्या जानेवारी महिन्यात तिने ही कंपनी सुरू केली होती. आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या यशाचं श्रेय तिने आपल्या वडिलांना दिलं. त्यांच्यामुळेच आपल्याला विज्ञान आणि टेक विषयात गोडी निर्माण झाल्याचं तिने सांगितलं.

मोठमोठ्या कंपन्यांची फंडिंग

प्रांजलीच्या कंपनीला एआय स्टार्टअप अ‍ॅक्सेलेरेटरमध्ये संधी मिळाली, हाच या कंपनीसाठी टर्निंग पॉइंट ठरला. प्रॉडक्ट हंटमध्ये या कंपनीच्या बीटा लाँचला भरपूर प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात ऑन डेक आणि व्हिलेज ग्लोबल या कंपन्यांनी फंडिंग दिलं. या दोन्ही कंपन्यांकडून सुमारे 4,50,000 मिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 3.7 कोटी रुपयांची फंडिंग मिळाली. यानंतर आता कंपनीचं सध्याचं इव्हॅल्युएशन तब्बल 100 कोटी रुपये एवढं झालं आहे.

सातव्या वर्षीच कोडिंगला सुरूवात

वयाच्या सातव्या वर्षीच प्रांजलीने कोडिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ती 11 वर्षांची असताना त्यांचं कुटुंब फ्लोरिडाला शिफ्ट झालं. यानंतर तिला कम्प्युटर विज्ञान क्षेत्रात आणखी चांगल्या संधी मिळाल्या. 13 वर्षांची असताना तिने फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिवर्सिटीमध्ये इंटर्नशिप केली. यानंतर तिने स्वतःची कंपनी उभारण्याच्या दृष्टीने काम सुरू केलं.

कोरोना काळात केलं काम

इंटर्नशिप सुरू असताना प्रांजलीने मशीन लर्निंग प्रोजेक्ट्सवर काम केलं. सोबतच ऑनलाईन माध्यमातून ती आपलं शालेय शिक्षण देखील पूर्ण करत होती. याच काळामध्ये ओपन एआय कंपनीने चॅटजीपीटी बीटा 3 हे लाँच केलं होतं. यामुळेच प्रांजलीच्या डोक्यात एआयचा वापर करून रिसर्च डेटा एक्स्ट्रॅक्शन आणि समरायझेशन करण्याचा विचार आला. यानुसार तिने Delv.AI या संकल्पनेवर काम सुरू केलं.

काय आहे कंपनी?

Delv.AI ही कंपनी उपलब्ध ऑनलाईन कंटेंटपैकी रिसर्चर्सना विशिष्ट माहिती अगदी कौशल्यपूर्ण पद्धतीने मिळवून देण्यासाठी काम करते. हेच या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं प्रांजलीने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT