Indian Army Jetpack Suit eSakal
विज्ञान-तंत्र

Indian Army Jetpack Suit : शत्रूशी आयर्नमॅन प्रमाणे लढणार भारताचे जवान! नव्या 'जेटपॅक सूट'ची चाचणी; पाहा व्हिडिओ

Indian Army : लष्कराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sudesh

पाठीवर जेटपॅक लावून हवेत उडणारे सुपरहीरो तुम्ही आतापर्यंत चित्रपटात पाहिले असतील. मात्र, आता भारताचे सैनिकही अशा प्रकारेच आपल्या शत्रूशी लढू शकणार आहेत. यासाठी आग्र्यामधील आर्मी एअरबोर्न ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रात्यक्षिक आणि चाचणी पार पडली.

इंडियन एअरोस्पेस डिफेन्स न्यूज (IADN) या एक्स (ट्विटर) हँडलवरुन या चाचणीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "आग्र्यामधील AATS येथे पॅरा एसएफ कमांडो हे नवीन जेटपॅक सूटची चाचणी घेत आहेत." अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. लष्कराने असे 48 जेटपॅक्स मागवले आहेत.

सुपरहीरो कमांडो

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की सैन्यातील जवान हे एक जेटपॅक सूट घालून हवेत उडत आहेत. हवेत उडणाऱ्या जवानाच्या पाठीवर आणि दोन्ही हातांमध्ये जेट इंजिन आहेत. हातातील इंजिन्समुळे त्याला हवेमध्ये वळण घेणं शक्य होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Indian Army News)

सोशल मीडियावर व्हायरल

लष्कराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्स (ट्विटर) वर या व्हिडिओला एक लाखांहून अधिक यूजर्सनी पाहिलं आहे. कित्येक यूजर्सनी ही एक गर्वाची बाब असल्याचं म्हटलं आहे. तर, अनेकांनी भारतीय सैन्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT