Aadhar Card Update Online esakal
विज्ञान-तंत्र

Aadhar Card Update Online : आता घरबसल्या करा आधार अपडेट

आधार कार्डवर पत्ता, फोन नंबर, नाव आणि जन्मतारीख अशा गोष्टी ऑनलाइन कशा बदलू शकता

सकाळ डिजिटल टीम

Aadhar Card Update Online : तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक माहितीत जर बदल करायचा असल्यास आता कुठेही फिरण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या हे करु शकता. आधार कार्डवर पत्ता, फोन नंबर, नाव आणि जन्मतारीख अशा गोष्टी ऑनलाइन कशा बदलू शकता ते जाणून घेऊ

स्टेप १ : UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://uidai.gov.in/ आणि "माय आधार" टॅबमधील "अपडेट आधार" पर्यायावर क्लिक करा.

स्टेप २ : "अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन" या पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर "अपडेट आधार" विभागाच्या आतील या "अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन" या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ३ : त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोड टाका. मग "ओटीपी पाठवा" बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळेल.

स्टेप ४: दिलेल्या जागेत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि "लॉगिन" बटणावर क्लिक करा.

स्टेप ५: त्यानंतर तुम्ही करू इच्छित बदलांना समर्थन देणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. म्हणजेच तुम्हाला जी देखील गोष्ट किंवा मजकूर बदलायचा आहे तो योग्य आहे हे दाखवणारे इतर डॉक्यूमेंट्स अपलोड करा. तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुमचा पत्ता पुरावा जसे की लाईट बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासपोर्ट अपलोड करा.

स्टेप ६ : तुम्ही केलेले बदल पुन्हा तपासा आणि माहितीची पडताळणी करा. आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

स्टेप ७ : त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या लिस्टमधून BPO Service ऑप्शन निवडा. BPO Service प्रोव्हाईडर्सला UIDAI द्वारे आधार अपडेटसंबधित रिक्वेस्ट हाताळण्यासाठी अधिकृत केले गेले आहे. ते तुमची माहिती वेरिफाय करती.

स्टेप ८: तुमच्या अपडेट विनंतीची पुष्टी करा आणि "सबमिट" बटणावर क्लिक करा.

स्टेप ९: विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला युनिक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) सह पुष्टीकरण मिळेल. तुम्हाला हा URN सांभाळून ठेवावा लागेल कारण याद्वारेच तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करु शकता.

स्टेप १० : वरील सर्व स्टेप्स झाल्यानंतर ठरावीक काळानंतर तुमची माहिती अपडेट होईल तोवर तुम्ही UIDAI वेबसाइटवर किंवा UIDAI मोबाइल अॅपद्वारे URN वापरून तुमच्या अपडेट विनंतीची स्थिती ट्रॅक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT