AC cabins eSakal
विज्ञान-तंत्र

AC Cabin : ट्रकचालकांना दिलासा! आता केबिनमध्ये एसी लावणं सक्तीचं; गडकरींचा मोठा निर्णय

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

Sudesh

देशातील सर्व ट्रक चालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आता ट्रक कंपन्यांना केबिनमध्ये एसी लावण्याची सक्ती केली आहे. यामुळे ११-१२ तास ट्रक चालवणाऱ्या चालकांचा प्रवास नक्कीच आरामदायक होणार आहे.

व्हॉल्वो आणि स्कॅनिया अशा विदेशातील मोठ्या ट्रक कंपन्या आपल्या चालकांसाठी केबिनमध्ये एसीची सुविधा देतात. मात्र, भारतातील ट्रक कंपन्या याबाबत विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे आता सरकारच्या या आदेशानंतर आता देशातील ट्रक कंपन्यांनाही केबिनमध्ये एसी लावणं अनिवार्य होणार आहे.

गडकरींचा निर्णय

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की ट्रकच्या केबिनमध्ये एसी लावण्याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी देशभरातील ट्रकमध्ये असा बदल करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत सर्व कंपन्यांनी आपल्या ट्रकमध्ये याप्रमाणे बदल करून घ्यावेत, असं गडकरींनी स्पष्ट केलं.

"आपल्या देशात कित्येक ड्रायव्हर १२ ते १४ तास ट्रक चालवतात. देशात कित्येक ठिकाणी ४३ ते ४७ अंश सेल्सिअस तापमान असते. त्यामुळे या चालकांचे भरपूर हाल होतात. मी मंत्री झाल्यापासून ट्रक केबिनमध्ये एसी लावण्यासंबंधी मागणी करत होतो. मात्र, यामुळे ट्रकच्या किंमती वाढतील असं म्हणून काही लोक याला विरोध करत होते. मात्र, आज मी याच्या सक्तीबाबत आदेश जारी केला आहे", असं गडकरी म्हणाले.

अपघात होणार कमी

यामुळे ट्रकची किंमत ही दहा ते वीस हजारांनी वाढू शकते. मात्र, ड्रायव्हरच्या थकव्यामुळे होणारे अपघातही कमी होणार आहेत. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचं मत ट्रक चालकांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT