ISRO Sun Mission Aditya L1 eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO Sun Mission : 'आदित्य'सोबत जाणार 'PAPA' आणि इतर उपकरणे; सूर्याचा कशा प्रकारे करणार अभ्यास? जाणून घ्या

Aditya L1 : आदित्य उपग्रहाचं प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

Sudesh

चांद्रयान-3 च्या यशानंतर आता सौरमोहीम पार पाडण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. यासाठी 2 सप्टेंबर रोजी आदित्य हा उपग्रह लाँच करण्यात येणार आहे. या उपग्रहामध्ये एकूण 7 पेलोड असणार आहेत. ही सात उपकरणे विविध गोष्टींसाठी वापरण्यात येणार आहेत.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो ही मोहीम राबवणार आहे. यासाठी आदित्य हा उपग्रह, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर ठेवण्यात येईल. या पॉइंटपासून हा उपग्रह सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करेल. यामध्ये कोणती उपकरणं आहेत, आणि त्यांचं काय काम असणार आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

PAPA

'प्लाज्मा अ‍ॅनलायझर पॅकेज फॉर आदित्य', म्हणजेच PAPA हे उपकरण सूर्यावरील गरम हवेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आणि जड आयन्सच्या दिशांचा अभ्यास करेल. सूर्यावरील हवेत, वादळांमध्ये किती तापमान आणि हीट असते याची माहिती यामधून मिळेल.

VELC

व्हिजिबल लाईन इमिशन कोरोनाग्राफ - हे उपकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने तयार केलं आहे. सूर्याचे सुस्पष्ट आणि HD फोटो घेण्यासाठी याचा वापर होईल. (ISRO Sun Mission)

SUIT

सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप, या उपकरणाच्या नावातच याचा अंदाज येऊ शकेल. सूर्याच्या अल्ट्राव्हायलेटं वेव्हलेंथवर लक्ष ठेऊन, त्याचे फोटो घेण्याचं काम हे उपकरण करेल. सोबतच, सूर्याचे फोटोस्फेअर आणि क्रोमोस्फेअरचे फोटो घेण्यासाठी देखील याची मदत होईल.

SoLEXS

सोलर लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर हे उपकरण सूर्यातून येणाऱ्या एक्सरेंचा अभ्यास करेल. यासोबतच सूर्यातून येणाऱ्या सौर-लाटांचा वापर करण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे.

Aditya L1 Design

HEL1OS

हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर - हे उपकरण एक हार्ड एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आहे. सूर्यातून येणाऱ्या हार्ड एक्स-रे किरणांचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर होईल.

इतर तीन पेलोड

यासोबतच, SWIS, STEPS-1 आणि MAGNETOMETER ही तीन उपकरणं देखील 'आदित्य' उपग्रहात असणार आहेत. लँग्रेज पॉइंटवरील कणांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या उपकरणांचा वापर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT