Aditya L1 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Launch : 'आदित्य एल-1'च्या यशासाठी परदेशी अंतराळ संस्था करणार मदत; काय आहे कारण?

ISRO Solar Mission : 'आदित्य एल-1'चे यशस्वी प्रक्षेपण करुन इस्रोने आणखी एक विक्रम रचला आहे.

Sudesh

काही दिवसांपूर्वी इस्रोने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडली होती. यानंतर आज इस्रोने 'आदित्य एल-1'चे यशस्वी प्रक्षेपण करुन आणखी एक विक्रम रचला आहे. ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. आज दुपारी इस्रोने ही कामगिरी पार पाडली.

आदित्य उपग्रह हा सध्या पृथ्वीच्या बाहेरील कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात आला आहे. पुढील काही दिवस हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत राहील. 18 सप्टेंबरनंतर हा उपग्रह पृथ्वीची कक्षा सोडून L1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल.

एल-1 हा अंतराळातील पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. याठिकाणी पृथ्वीचं आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण एकमेकांना बॅलन्स करतं, त्यामुळे या पॉइंटवर आदित्य उपग्रह प्रस्थापित करण्यात येईल. अर्थात, याठिकाणी पोहोचण्याचा आदित्यचा प्रवास सोपा नसणार आहे.

डीप स्पेसमध्ये प्रवास

अंतराळात प्रवास करताना एखादा उपग्रह पृथ्वीपासून जेवढा दूर जाईल, तेवढा त्याला मिळणारा सिग्नल कमकुवत होत जातो. त्यामुळे डीप स्पेसमध्ये प्रवास करणं हे अत्यंत जोखमीचं असतं.

इतर संस्थांची मदत

यामुळेच, मोठ्या अंतराळ मोहिमांदरम्यान कित्येक देश एकमेकांना सहकार्य करतात. इतर देशांचे शक्तिशाली अँटीना वापरून लहान देश आपापल्या यानाशी संपर्क साधतात.

आपली पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरत असल्यामुळे, एका पॉइंटला यानाचं प्रक्षेपण करणारा देश हा यानाच्या लोकेशनपासून दूर जातो. अशा वेळी, तिथून जवळ असणाऱ्या इतर देशांचे अँटीना संपर्क प्रस्थापित करण्यासाठी फायद्याचे ठरतात.

आदित्य मोहिमेसाठी मदत

आदित्य एल-1 मोहिमेसाठी आपली सर्वाधिक मदत युरोपीय स्पेस एजन्सी करणार आहे. या संस्थेने चांद्रयान-3 मोहिमेदरम्यान देखील आपल्याला ग्राउंड सपोर्ट दिला होता. आपल्या 35 मीटर डीप स्पेस अँटीनाच्या मदतीने ESA 'आदित्य एल-1'ला देखील ग्राउंड सपोर्ट देणार आहे. हे अँटीना युरोपात ठिकठिकाणी सेट करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त 'ऑर्बिट लोकेशन सॉफ्टवेअर' साठी देखील युरोपियन स्पेस एजन्सी इस्रोची मदत करेल. आदित्य उपग्रह नेमका कोणत्या ठिकाणी आहे हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. हा उपग्रह L-1 पॉइंटवर पोहोचेपर्यंत ESA इस्रोची मदत करेल. सोबतच, पुढील दोन वर्षे आदित्यला कमांड देण्यासाठी देखील ही संस्था आपल्याला मदत करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT