Aditya L1 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Update : 'आदित्य एल-1' पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत, आता 40 हजार किलोमीटर उंचीवर पोहोचला उपग्रह; इस्रोने दिली अपडेट

ISRO Sun Mission : आदित्य एल-1 ही भारताची पहिली सौर मोहीम आहे.

Sudesh

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेला पहिला उपग्रह 'आदित्य एल-1' हा पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचला आहे. आज पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी आदित्यचे दुसरे अर्थ-बाउंड मॅन्यूव्हर पार पडल्याचं इस्रोने सांगितलं आहे.

इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरुन याबाबत माहिती दिली. आदित्य उपग्रह हा सध्या पृथ्वीपासून 282x40,225 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या कक्षेत पोहोचला असल्याचं इस्रोने सांगितलं.

आदित्यला दुसऱ्या कक्षेत ढकलण्याची प्रक्रिया बंगळुरू येथील ISTRAC सेंटरमधून पार पाडण्यात आली. या दरम्यान संस्थेच्या मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथील केंद्रांवरून आदित्य उपग्रहाला ट्रॅक करण्यात आलं.

पुढील प्रक्रिया 10 सप्टेंबरला

आदित्यला पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पाठवण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी पार पडेल. या दिवशी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास हे मॅन्यूव्हर करण्यात येईल. हा उपग्रह सुस्थितीत असून, मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं.

चार महिन्यांचा प्रवास

आदित्य हा उपग्रह 18 तारखेपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत असणार आहे. त्यानंतर तो अंतराळात असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास करेल. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या या पॉइंटवर आदित्य उपग्रह प्रस्थापित करण्यात येईल. यासाठी आदित्यला सुमारे चार महिने प्रवास करावा लागणार आहे.

यानंतर एल-1 या पॉइंटवरुन पुढील पाच वर्षांपर्यंत 'आदित्य' सूर्याचा अभ्यास करेल. या पॉइंटवर असणारी वस्तू, त्याच ठिकाणी स्थिर राहते हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच आदित्य उपग्रह या पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT