affordable poco m4 pro and poco c31 broke all records by selling most units in their segments 
विज्ञान-तंत्र

फ्लिपकार्ट सेलमध्ये 'या' फोनची विक्री सर्वाधिक; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

सकाळ डिजिटल टीम

चायनीज टेक कंपनी पोकोच्या स्मार्टफोन्सवरही फेस्टीव्हल सेलमध्ये मोठी सूट देण्यात आले आहे. कंपनीच्या डिव्हाइसेसना बजेट सेगमेंटमध्ये ग्राहकांकडून चांगली पसंती दिली जात आहे आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये त्याच्या डिव्हाइसेसची देखील जोरदार विक्री झाली. Poco M4 Pro आणि Poco C31 त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे स्मार्टफोन बनले आहेत.

पोको इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून नवीन रेकॉर्डशी संबंधित माहिती दिली आहे. त्याने सांगितले की Poco M4 Pro हा 15,000 रुपयांच्या अंतर्गत सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकला जाणारा AMOLED डिस्प्ले फोन बनला आहे. त्याच वेळी, Poco C31 हा 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकला जाणारा डिव्हाइस बनला आहे.

Poco M4 Pro वर किती सूट मिळतेय

Poco M4 Pro स्मार्टफोनची 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची लिस्टेड किंमत 17,999 रुपये आहे, पण तो सेलमध्ये 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी, अॅक्सिस बँक किंवा ICICI बँक कार्ड्ससह या फोनवर अतिरिक्त सवलत देखील उपलब्ध आहे. जर ग्राहकांनी त्यांचा जुना फोन एक्सचेंज केला तर त्यांना 10,400 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो.

Poco M4 Pro चे फीचर्स

6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये MediaTek G96 प्रोसेसर दिला आहे. फोनच्या मागील पॅनलवर 64MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा मिळतो आहे, तर फ्रंट पॅनलवर 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Poco C31 तर किती सूट

बजेट सेगमेंटमध्ये, Poco C31 स्मार्टफोन 3GB + 32GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी केवळ 6,666 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. त्याच वेळी, फोनचा 4GB + 64GB व्हेरिएंट 7,777 रुपयांना लिस्टेड आहे. बँक कार्डसह या डिव्हाइसवर अतिरिक्त सवलत आणि एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे.

Poco C31 चे स्पेसिफिकेशन्स

Poco चा हा बजेट फोन 6.53-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह येतो आणि त्यात MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. डिव्हाइसच्या मागील पॅनलवर 13MP + 2MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि समोर 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यात 5,000mAh क्षमतेची बॅटरी देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT