affordable recharge plans from jio airtel and vodafone idea those offers best value for money
affordable recharge plans from jio airtel and vodafone idea those offers best value for money  Sakal
विज्ञान-तंत्र

Prepaid Plans: स्वस्तातले रिचार्ज प्लॅन शोधताय? हे आहेत Airel, Jio अन् Vi चे बेस्ट पर्याय

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या सणापूर्वी तुमचा रिचार्ज प्लॅन संपला असेल आणि तुम्ही रीचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि भारती एअरटेलकडे बरेच पर्याय आहेत. जर तुम्ही सर्वात स्वस्त आणि व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन शोधत असाल, तर आज आपण काही पर्याया जाणून घेणार आहोत.

असे अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. बर्‍याच वेळा वापरकर्त्यांना थोड्या काळासाठी रिचार्ज करावे लागते आणि त्यांना जास्त बेनिफीट्सची आवश्यकता नसते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फक्त काही आठवड्यांसाठी रिचार्ज करायचे असेल आणि त्यासाठी चांगला प्लॅन शोधत असाल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या प्लॅनमधून निवडू शकता.

Airtel

Airtel वापरकर्त्यांना 1GB डेली डेटासह रुपयांचा 209 चा सर्वात स्वस्त प्लॅन मिळतो आणि हा प्लॅन 21 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. त्याच वेळी, जर तुमच्या गरजा दैनंदिन डेटाशी संबंधित नसतील, तर तुम्ही 155 रुपये किंवा 179 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज देखील करू शकता. या प्लॅनमध्ये 24 आणि 28 दिवसांसाठी अनुक्रमे 1GB आणि 2GB डेटा मिळतो.

याशिवाय, जर तुम्हाला सध्याच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा हवा असेल, तर तुम्ही अनुक्रमे 15GB, 12GB, 5GB आणि 3GB डेटा ऑफर करणार्‍या 148 रुपये, 118 रुपये, 98 रुपये किंवा 58 रुपयांच्या व्हाउचरसह रिचार्ज करू शकता.

Reliance Jio

जर तुम्हाला रोजच्या डेटासह प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन 149 रुपयांमध्ये 20 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग मिळते. त्याचप्रमाणे, 179 रुपये आणि 209 रुपयांचे प्लॅन अनुक्रमे 24 दिवस आणि 28 दिवसांच्या वैधतेसह समान फायदे देतात.

जर तुम्हाला रोजचा डेटा नको असेल, तर तुम्ही 155 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करू शकता, जे 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 2GB डेटा देतो. त्याच वेळी, डेटा बूस्टरबद्दल बोलायचे झाल्यास, 25 रुपयांमध्ये 2GB, 61 रुपयांमध्ये 6GB आणि 121 रुपयांमध्ये 12GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.

Vodafone Idea

Vodafone Idea च्या 269 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 1GB डेटा मिळतो. तसेच 234 आणि 199 रुपये किंमतीच्या प्लॅन्स 24 दिवस आणि 18 दिवसांच्या वैधतेसह समान फायदे देतात.

त्याच वेळी, 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 21 दिवसांच्या वैधतेसाठी एकूण 1GB डेटा मिळतो. याशिवाय हेच फायदे 155 रुपयांमध्ये 21 दिवसांसाठी उपलब्ध आहेत. 209 रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांना 24 दिवसांच्या वैधतेसह एकूण 4GB डेटा देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचं PM पद ते बारामतीचा खासदार कोण? पुण्याच्या ज्योतिषाचं मनमोहन सिंग यांच्याबद्दलचही भाकीत ठरलं होतं खरं

Elon Musk EVM : इलॉन मस्क विरुद्ध भारतीय EVM; भाजपा नेत्यानं दिलं सडेतोड प्रत्युत्तर,जाणून घ्या काय आहे प्रकरण

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Latest Marathi News Live Update : भोपाळमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं जंगी स्वागत

Ganga River: अंत्यसंस्कारानंतर स्नानासाठी जाताना दुर्घटना! गंगा नदीत बोट उलटल्याने ५ जण बुडाले, माजी NHAI अधिकाऱ्याचाही समावेश

SCROLL FOR NEXT